Israel-Iran war In the last 48 hours Missile strikes, cities destroyed, huge loss of life in both contries know the details
Israel Iran War News Marathi : मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमधील तणाव चांगलाचे पेटला आहे. शुक्रवारी (१३ जून) इस्रायलने केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरत्मक करावाई सुरु केली. तर इस्रायलचेही इराणवरील हल्ले सुरुच आहेत. यामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अनेकांचा मृत्यूही झाला आहे. परंतु हा संघर्ष वाढतच चालला आहे. गेल्या ४८ तासांत दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही देशांतील शहरे जळून खाक झाली आहे. प्रंचड जीवितहानी झाले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचेही हाल होत आहेत. आपण गेल्या ४८ तासांत नेमकं काय काय घडले ते जाणून घेऊयात.
शुक्रवारी (१३ जून) रात्री इस्रायलने इराणच्या अणु तळांवर, रहिवासी इमारतींवर आणि इराणच्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञांवर हल्ला केला. यामुळे तीव्र युद्ध सुरु झाले. इराणने संतप्त होत या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या तेल अवीव शहरांवर क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनचा हल्ला केला. यापैकी बहुतेक हल्ले रोखण्याच इस्रायलला यश आले. परंतु काही क्षेपणास्त्र इस्रायलच्या तेल अवीव शहरांवर पडले. त्यानंतरही दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतच राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात २१५ इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायवर इराणने केलेल्या हल्ल्याच ८ जणांचा बळी गेला आहे, तर २०० हून अधिक लोक गंभीर जखणी झाले आहेत.
This is the capital of Iran, Tehran, tonight.
Israel promised that if the regime targets Israeli civilians, it will pay a very heavy price. There is currently a widespread power outage in northern Tehran. pic.twitter.com/SzlSVfntQ7
— Hananya Naftali (@HananyaNaftali) June 14, 2025
दरम्यान इस्रायलने इराणच्या तेहरानमधील संरक्षण मंत्रालयावरही हल्ला केला आहे. तसेच अनेक अणु प्रयोगशाळा, अणु केंद्रे आणि रिफाययनरीना उद्ध्वस्त केले आहे. तसेच २० हून अधिक लष्करी अधिकारी ठार मारले गेले आहे. इस्रायलच्या IDF ने दावा केला आहे की, यामुळे इराणती अन्न सुरक्षा साखळी देखील नष्ट झाली आहे.
तर दुसरीकडे इराणने इस्रायल क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. यामध्ये तेल अवीवसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. तसेच इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट करण्यात आल्या आहेत.
रविवारी इस्रायलच्या प्रमुख बंदर शहर हैफावरही इराणने मोठा हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले आहे. हैफाशहरातील इमारतींना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याशिवाय तेल अवीव मधील इस्रायली सुरक्षा दल देखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. सध्या हे युद्ध आणखी चिघळत आहे. यामुळे जागतिकस्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.