Israel Iran War Iran attacks US embassy in Tel Aviv
Israel Iran War News Marathi : मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहेत. दरम्यान या युद्धात अमेरिका देखील ओढली गेली आहे. इराणने इस्रायलच्या तेल अवीव येथील अमेरिकन दूतावासांवर क्षेपणास्त्रे डागली आहे. या हल्ल्या दूतावासाच्या इमारतीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिची समोर आलेली नाही.
इराण इस्रायलवर सतत हल्ले करत आहे. यावेळी एक इराणी क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या दूतावासावरही डागण्यात आले. यामुळे दूतावासाच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणतेही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही, परंतु खबरदारी म्हणून तेल अवीवमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासा आणि जेरुसेलमधील दूतावास बंद करण्यात आले आहेत. तसेच अधिरकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले आहे.
परंतु इराण अमेरिकेला लक्ष्य का करत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पष्ट इशाऱ्यानंतरही इराणने अमेरिकेच्या दूतावासावर हल्ले केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले होते की, शनिवारी झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही हात नाही, यामुळे इराणने त्यांच्या लष्करी तळांवर किंवा कार्यलयांवर, अधिकाऱ्यांवर हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. परंतु तरीही इराणने अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला.
इराणच्या म्हणण्यानुसार, इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यात अमेरिकेचा हात आहे. अमेरिकेने अद्याप थेट मान्य केलेले नाही. परंतु ट्रम्प यांच्या आदेशावरुनच इस्रायल इराणवलर हल्ले करत आहे. शिवाय इस्रायलकडे असलेली शस्त्रे ही अमेरिकेची आहेत. अमेरिका इस्रायलला गुप्तपणे शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचा विश्वास इराणला आहे. अमेरिका अप्रत्यक्षपणे युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्याम इराणने असेही स्पष्ट केले आहे की, अमेरिका युद्धात सामील झाल्यास रशिया आणि चीनकडू आम्हालाही शस्त्रे मिळतील.
तेल अवीवच्या अमेरिकन दूतावासावरील हल्ल्याच्या एक दिवस आधीच इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ला झाला होता. अद्याप इराणने या हल्ल्याची थेट जबाबदारी घेतलीली नाही, परंतु हा हल्ला इराणने केल्याचा दावा केला जात आहे. ड्रोन हल्ले करुन इराणने अमेरिकन तळ उडवून दिले आहे. हा हल्ला डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सध्या इस्रायल आणि इराण युद्ध अधिक पेट घेत आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.