Israeli FM Gaza coup remarks : मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने एक मोठा आणि स्पष्ट भूमिका मांडत इराणच्या सत्तास्थितीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी म्हटले आहे की, इस्रायलला इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची इच्छा नाही, आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांना मारण्याचा कोणताही सरकारचा अजेंडा नाही.
ही प्रतिक्रिया सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत आली असून, अलीकडेच इस्रायल-इराण दरम्यान वाढलेले लष्करी तणाव, आणि इस्रायलकडून इराणच्या सुमारे ३० लष्करी अधिकाऱ्यांवर केलेले लक्ष्यबद्ध हल्ले, यामुळे चर्चेचा विषय बनले होते की इस्रायल इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनाही लक्ष्य करणार का?
“खामेनेईंना मारण्याचा कोणताही अजेंडा नाही” – गिदोन सार
गिदोन सार यांनी स्पष्ट सांगितले की, इस्रायलचा उद्देश इराणी नेत्यांना हटवण्याचा नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सत्तांतर हे इराणी जनतेनेच ठरवायचे असते. आमचे इराणी जनतेशी वैर नाही, आम्ही त्यांना शत्रू मानत नाही.” सार यांनी यावेळी इराणसोबतचे ऐतिहासिक संबंधही अधोरेखित केले. ते म्हणाले, “१९७९ पूर्वी इस्लामिक क्रांती होईपर्यंत आमचे इराणशी चांगले संबंध होते. पण क्रांतीनंतर एक क्रूर राजवट सत्तेत आली आणि संबंध बिघडले.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलची ‘F-35I Adir’ लढाऊ विमाने सज्ज; 2000 किमीपर्यंत मारा करूनच परतले मायदेशी
‘अमेरिकेचा मृत्यू, इस्रायलचा मृत्यू’चे नारे – इराणी राजवटीवर टीका
गिदोन सार यांनी इराणी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका करत म्हटले की, “ही अशी राजवट आहे जी ‘अमेरिकेचा मृत्यू, इस्रायलचा मृत्यू’ असे नारे देते. त्यामुळे आमच्यातील संघर्ष फक्त धोरणात्मक नाही, तर मूल्यांवरही आधारित आहे.”
I told @biannagolodryga on @CNN:
We learned from our history that when someone says they want to eliminate the Jewish people, take them at their word and take all necessary steps to prevent them from fulfilling their goal. pic.twitter.com/l58Cx5dC3c— Gideon Sa’ar | גדעון סער (@gidonsaar) June 15, 2025
credit : social media
खामेनींना लक्ष्य करण्याच्या अफवांवर स्पष्ट भूमिका
अलीकडच्या काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, इस्रायलने खामेनेईंना लक्ष्य करण्याची योजना आखली होती, पण ती नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे थांबवण्यात आली. माहितीनुसार, वॉशिंग्टनमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले होते की जोपर्यंत इराण अमेरिकन नागरिकाला ठार करत नाही, तोपर्यंत अशा उच्चस्तरीय हत्येस अमेरिका मान्यता देणार नाही. तथापि, इस्रायलच्या चॅनल १२ या वृत्तवाहिनीने या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “कोणताही राजकीय नेता इस्रायलसाठी अस्पृश्य नाही, मात्र ट्रम्प यांनी खरोखर व्हेटो लावला होता की नाही, याची कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.”
Israeli foreign minister Gideon Sa’ar: “The goal is not a regime change… This is for the Iranian people to decide, we, Israel… don’t see the Iranian people as our enemies.” – CNN pic.twitter.com/jv9GC2thGE
— Wladimir van Wilgenburg (@vvanwilgenburg) June 15, 2025
credit : social media
सत्तांतराची भूमिका नाकारून दबाव वाढवण्याचा प्रयत्न?
विश्लेषकांच्या मते, गिदोन सार यांनी जरी इराणमध्ये सत्तापालट नको असे स्पष्ट केले असले, तरी त्यांनी इराणी सत्ताधाऱ्यांविरोधात सखोल आक्रमक भाषा वापरली आहे, आणि ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणवर दबाव वाढवण्याचा एक प्रकार असू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता; इराणच्या ‘Hormuz’ सामुद्रधुनीवरून जोरदार संघर्षाची चिन्हे
इस्रायल-इराण तणावाच्या छायेत नवे संकेत
सध्याच्या घडीला, इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान एक राजकीय संदेश मानले जात आहे की इस्रायल युद्ध टाळू इच्छित आहे, मात्र त्यांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या नेत्यांविरुद्ध ते शांत राहणार नाहीत. हे वक्तव्य इराणसाठी एक गंभीर संकेत मानला जात आहे, की जर त्यांनी इस्रायलला थेट धमकी दिली तर इस्रायल कोणत्याही टोकाच्या निर्णयास मागे हटणार नाही. या परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.