Israel Iran War: इराण-इस्रायल युद्धात चीनची मध्यस्थी ; ड्रॅगनने तेहरानला पाठवली 'ही' मोठी मदत, जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : बिजिंग : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमधील तणाव युद्धात बदलला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करत आहे. याच तणावादरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणला चीनीकडून मोठी लष्करी मदत मिळाली आहे. चीनचे एक मालवाहू विमानाचे लॅंडिग तेहरानमध्ये झाले चीनच्या इराणला लष्करी मदत पुरवण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मालवाहू विमानाचे ट्रान्सपॉंन्डर बंद करण्यात आले आहे. यामुळे या विमानाचे रडार डिटेक्शन करता आले नाही.
दरम्यान चीन आणि इराणमध्ये झालेल्या गुप्त लष्करी चर्चेशी ही घटना असल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनन या विमानाने इराणला शस्त्रे आणि इतर गोपनीय लष्करी उपकरणे पुरवत आहे. चीन आणि इराणमध्ये गेल्या अनेक काळापासून घट्टा मैत्री आहे. यामुळे चीन इराणला मदत करत असून ही धोरणात्मक मदत इराणला अधिक बळकट बनवत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला होता. त्यांनी अमेरिकेवर इराणने कोणताही हल्ला केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. अशा परिस्थिती चीनची इराणला लष्करी मदत उघड पाठिंबा दर्शवते. यामुळे चीनचे हे पाऊल अमेरिका आणि इस्रायलसाठी धोकादायक मानले जात आहे.
यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी, इराणच्या सार्वभैमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी इराणच्या बाजूने उभे राहणार असल्याचे म्हटले होते. इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन या मोहीमेंतर्गत केलेल्या हल्ल्यांवर चीनने चिंता व्यक्त केली होती. चीनने इस्रायलच्या या कारवायांमुळे मध्य पूर्वेत तणाव वाढत असल्याचे म्हटले होते. तसेटच इस्रायलच्या या कृतीला विरोधही केला.
शुक्रवारी (१३ जून) इस्रायलच्या हवाईदलाने इराणच्या आण्विक तळांवर, लष्करी कमांड सेंटरवर आणि धोरणात्मक मंत्रालयांवर हल्ले केले. सुमारे २०० लाढाभ विमानांसह हल्ले करण्यात आले. याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर संघर्ष अधिक पेटला. दरम्यान शनिवारी (१४ जून) रात्री दोन्ही देशांनी पुन्हा एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत १०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हा संघर्ष असाच सुरु राहिला तर तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे.