Iran proposes Islamic Army with Turkey, Pakistan and Saudi Arabia
Israel-Iran War News Marathi : तेहरान : गेल्या चार दिवसांपासून मध्य पूर्वेत इराण-इस्रायलमधील संघर्ष वाढत चालला आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष सुरु झाला. दोन्ही देश एकमेकांवर प्रत्युत्तरातम्क कारवाई करत आहेत. अशातच काही देशांचा इराणला तर काही देशांचा इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. तर काही देशांनी इराण आणि इस्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
याच वेळी इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एक खळबळजनक प्रस्ताव सादर केला आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्याने तुर्की, सौदी अरेबिया, आणि पाकिस्तानला इस्रायलविरोधी एकत्र येण्याचे आवाहान केले आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समधील वरिष्ठ अधिकारी मोहसेन रेझाई यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी तुर्की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला इस्लामिक सैन्य स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे इस्रायलविरोधी एकत्र येण्याचे म्हटले आहे.
इराणी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रेझाई यांनी इस्रायलविरोधी इस्लामिक देशांनी पाऊल उचलणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. रेझाई यांनी यासाठी सौदीर अरेबिया, पाकिस्तान या देशांना इस्लामिक आर्मी स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. रेझाई यांचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांचे सैन्. एखमेकांवर हल्ले करत आहे.
रेझाई यांनी याला एक व्यवस्थापित संघर्ष म्हणून संबोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलविरोधी जगातील इस्लामिक देश एकत्र आले तर युद्ध जिंकणे सोपे जाईल. या प्रस्तावामागे इराणचा नेमका हेतू का आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इराण स्वत:ला इस्लामिक जगाचा नेता म्हणून सादर करु इच्छित आहे.
दरम्यान मोहसेन सेझाई यांच्या या प्रस्तावाला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. परंतु अद्याप सौदी अरेबियाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आहलेली नाही. रेझाई यांनी मुलाखतीवेळी सांगतिले की, पाकिस्तानने आम्हाला आश्वासन दिले आहे की, इस्रायलने इराणवर हल्ला केल्या पाकिस्तान त्यांच्यावर अणु बॉम्बचा हल्ला करेल. यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी देखील इस्लामिक देशांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.
सध्या तुर्की आणि सौदी अरेबियाच्यामध्ये तणाव असल्याने दोन्ही देशांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु तुर्कीने इराणला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच ओआयसी देश देखील इस्रायलविरोधी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्लामिक देश इस्रायलविरोधी एकत्र येणार असल्याचे तीव्र शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर कोणतीही व्यावहारिक किंवा अधिकृत प्रतिक्रिया मात्र समोर आलेली नाही.