इराणच्या राजधानीत चेंगराचेंगरी (फोटो- सोशल मिडिया)
इराण इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने तेल अविवमधील अमेरिकेच्या दूतावावर हल्ला केला आहे. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याने इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठी गडबड उडाली आहे. तेहरानमधील नागरिक शहर सोडून जाण्यासाठी धावपळ करत आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
राजधानी तेहरानच्या रस्त्यांवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. इस्त्रायालच्या हल्ल्याने सर्वांना तेहरान सोडण्याची धावपळ सुरू झाली आहे. अन्य शहरांत जाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. इस्त्रायाल तेहरानवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागत आहे. तेरानमधील स्थिती गंभीर झाली आहे.
#Iran
The exodus of residents from Tehran continues — it did not stop all night, and heavy traffic jams are still being observed in the morning. pic.twitter.com/11v7CZ9PH3— Boris Alexander Beissner (@boris_beissner) June 16, 2025
इस्त्रायलच्या भीषण हल्ल्यामुळे तेहरानमधील नागरिक शहर सोडून चालले आहेत. इस्त्रायाल तेहरानवर सातत्याने हल्ले करत आहे. समोर आलेल्या एका माहितीनुसार, तेहरानमधील नागरिक उत्तर इराणकडे जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र रस्त्यावर एकच गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
घर सोडून चालले नागरिक
इस्त्रायलच्या हल्ल्याने तेहरानमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेहरानमध्ये गड्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वाहनांची भली मोठी रांग लगली आहे. युद्धजन्य स्थितीमुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे.
भारतीयांना तेहरान सोडण्याचे आदेश
इराण इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने तेल अविवमधील अमेरिकेच्या दूतावावर हल्ला केला आहे. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय नागरिकांना सायंकाळपर्यंत शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. सध्या इराणमध्ये 10000 भारतीय नागरिक आणि 1500 विद्यार्थी अडकले आहेत.इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर भारतीय विद्यार्थी आणि नोकरीसाठी इराणमध्ये गेलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आल्याची माहिती आहे.
इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले आहेत, त्यापैकी १५०० विद्यार्थी आहेत आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची तयारी देखील सुरू झाली आहे. भारत सरकारने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की इराणमध्ये उपस्थित असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे इराण सरकारनेही, सर्व विमानतळ बंद आहेत परंतु जमिनीवरील सीमेवरून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे शक्य असल्याचं भारत सरकारला सांगितलं आहे.
इराणने सर्व भारतीयांची माहिती मागितली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना घरातच राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की दूतावासाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, “तेहरानमधील भारतीय दूतावास सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहे जेणेकरून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.