Israel Iran War 'Israel is a merchant of terrorism' US envoy fumbles & accidentally accuses Israel of terror
Israel Iran War News Marathi: जेरुसेलम: इराण आणि इस्रायल संघर्ष तीव्र भडकला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत.१३ जून रोजी इस्रायलने केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर हे युद्ध तीव्र भडकले आहे. इस्रायलने इराणवच्या अणु भट्टीवर लक्ष्य केले आणि याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. एक आठवड्यापासून हे युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांचे तीव्र नुकसान होत आहे.
अशातच या युद्धात अमेरिकेने देखील इस्रायलच्या बाजूने उडी मारली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत असे काही घडले आहे की यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.तसेच याचा इस्रायललाही मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या राजदूताने संयुक्त राष्ट्रात केलेल्या चूकीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिकेला याचे स्पष्टीरकरण द्यावे लागले आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये बैठकीदरम्याम अमेरिकन राजदूताने मोठी चूक केली. शुक्रवारी २० जून रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेच्या कार्यवाहक स्थायी प्रतिनिधी डोरोथी शिया यांनी इस्रायलला चुकून दहशतवाद आणि विनाश पसरवणारा देश म्हणून संबोधले. त्यांच्या या विधानाने परिषदेत मोठी खळबळ उडाली होती. परंतु डोरोथी शिया यांनी चुकू लगेच सुधारली. त्यांनी इराण दहशतवाद आणि विनाश पसरवत असल्याचे म्हटले. परंतु हे विधान सर्वत्र व्हायरल झाले होते.
शिया यांनी आपली चूक सुधारत इराणवर गंभीर आरोप केले. त्यांनी इराण हा मध्य पूर्वेतील दहशतवादी आणि अस्थिरतेचे केंद्र आहे. सध्या त्यांच्या अण्वस्त्रे बनवण्यासाठी सर्व संसाधने आहे. हे अमेरिकेला अस्वीतकार्य आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इराणवर दबाव आणत अणु कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामुळे विनाशाचा धोका टळेल असे त्यांनी म्हटले आहे.
याच वेळी इराणने आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख रोफेल ग्रोसी यांच्याविरोधात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आणि सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणचे राजदूत अमीर-सईद इरावनी यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की, राफोल ग्रोसी यांनी इराणच्या शांततापूर्ण अणु कार्यक्रमाबाबद चुकीची माहिती पसरवली. त्यांनी आरोप केली केली, ग्रोसी यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्यांचा निषेध करायला हवा होता, जो त्यांनी केला नाही.
सध्या मध्य पूर्वेत या सर्व घडामोडींमुळे विनाशाचे वातावरण पसरलेले आहे. सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.