Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली? खामेनींनी अमेरिकेच्या कट्टर शत्रूला सोपवली 'ही' मोठी जबाबदारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने १३ जून रोजी केलेल्या इराणवरील हल्ल्यानंतर हे युद्ध भडकले. गेले सात दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या अनेक लष्करी व उच्च अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले आहे. यामुळे इराणची लष्करी क्षमता कमकुवत होताना दिसत आहे. परंतु याचे वेळी इराणने एक मोठे पाऊल उचचले आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
इराणने अमेरिकेच्या सर्वाच मोठ्या शत्रूला एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या व्यक्तीला पाश्चात्य देशांमध्ये मानवी हक्कांचा खुनी म्मून ओळखले जाते. इरामचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी नियुक्त केले आहे. खामेनी यांनी मोहम्मद करामी यांची IRGC ग्राऊंड फोर्सच्या नव्या कमांडरसाठी नियुक्त केली आहे.
मोहम्मद करामीवर २०१९ आणि २०२०च्या निदर्शनांचा क्रूर दमन केल्याचा आरोप आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन आणि यूकेने करामीवर निर्बंध लादले आहे. दरम्यान या युद्धाच्या परिस्थीती इराणच्या आयआरजीसीच्या प्रमुखपदी त्याची निवड अमेरिकेसाठी धोकादायक मानली जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
२०१९ मध्ये इराणमध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने काढण्यात आली होती. यावेळी करामीने निदर्शकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते. अमेरिकेन नंतर त्याला काळ्या यादीत सामील केले होते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनने त्याच्यावर मानवी हक्कांते उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. करामीने सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांवर अमानुष छळ केला होता.
तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये झाहेदान शहरात एक भयंकर घटना घडली होती. या दिवशी सुरक्षा दलांना निदर्शकांवर तीव्र गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्यासाठी करमीला जबाबदार धरले होते. या घटनेला ब्लडी फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते.
मार्च २०१९ मध्ये करमी यांच्याकडे आयआरसीजीसीच्या कुद्स मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे मुख्यालय सिस्तान आणि बलुचिस्तान प्रतांता कार्यरत होते. या क्षेत्रात अनेक सरकारविरोधी कारवाया आणि निदर्शने घडली होती. यावेळी करमीला सिस्तान आणि बलुचिस्तानचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या करमी यांच्याकडे आयआरसीजीसीच्या ग्राउंड फोर्स कमांडर पदाची जबाबदारी आहे.