Israel Iran War Nuclear scientist's entire family killed in Israel's attack on Iran
Israel Iran War News Marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष सध्या थांबला आहे. मात्र तणाव अद्यापही कायम आहे. दरम्यान युद्धबंदीनंतर अनेक धक्कादायक आणि हृदयद्रावर घटनांचा खुलास होत आहे. यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. युद्धबंदीच्या काही दिवसानंतर इराणी माध्यमांनी एक धक्कादायक माहितीचा खुलासा केला आहे.
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धदरम्यान इस्रायलने इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले होते. एवढेच नव्हे तर इस्रायलने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहेत. एका हल्ल्यात एका अणुशास्त्रज्ञासह त्यांच्या कुटुंबातील ११ सदस्यांचा बळी गेला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तसेच वृद्धांचाही समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडात भारतीय तरुणीवर प्राणघातक हल्ला ; चाकूने तीव्र वार अन्…
इस्रायलने १३ जून रोजी ऑपरेशन रायझिंग लायन सुरु केले होते. या ऑपरेशनअंतर्गत इस्रायलने इराणच्या अणुतळांवर, शास्त्रज्ञांवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले केले होते. या मोहीमेची तयारी इस्रायलने बऱ्याच काळापूर्वी सुरु केली होती. याअंतर्गत इस्रायलची मोसाद गुप्तचर संस्था इराणवर लक्ष ठेवून होती.
इस्रायलने दावा केला आहे की, या हल्ल्यांमध्ये केवळ लक्ष्यित लोक मारले गेले आहे. परंतु इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे इस्रायलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इस्रायलने रायझिंग लायन अंतर्गत १० इराणी अणुशास्त्रज्ञांवर हल्ला केला होता. यातील एका शास्त्रज्ञांच्या कुटुंबाला देखील लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात शास्त्रज्ञासह कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुले महिला मुले आणि वृद्धांचा समावेश आहे.
इराणच्या उत्तरी भागातील कॅस्पियन समुद्राजवळ अस्तानेह अशरफीह शहरात हल्ला करण्यात आला. यामध्ये एक अणुशास्त्रज्ञाचे कुटुंब मारले गेले. सेदिघी साबेर असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. या शास्त्रज्ञाच्या कुटुंबातील सदस्यांना घरातून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचाही वेळ मिळाला नाही. हा हल्ला अतिशय क्रूर आणि अचूक होता. यामुळे घरातील सर्व सदस्य मृत्यूमुखी पडले.
या हल्ल्यानंतर इस्रायलच्या लष्करी धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार केवळ शास्त्रज्ञांना लक्ष्य करण्यात आले होते. परंतु सेदिघी साबेर यांच्या कुटुंबींयाच्या मृत्यूमूळे इस्रायलच्या अचूक दाव्यांवर प्रश्न उपस्थि केले जात आहे.
दरम्यान २२ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र इराणने युद्धबंदी मानण्यास नकार दिला होता. सध्या दोन्ही देशांनी हल्ले थांबवले आहेत. परंतु दोन्ही देशांमध्ये तणाव अजूनही आहे.