कॅनडात भारतीय तरुणीवर प्राणघात हल्ला ; चाकूने तीव्र वार अन्... (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Canada News Marathi : ओटावा : एक मोठी बातमी समोर येत आहे. कॅनडातमध्ये एका भारतीय तरुणीवर चाकून हल्ला करण्यात आला आहे. कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी विनिपेगमध्ये ही दु:खद घटना घडली आहे. यामध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या तरुणीचे नाव तनप्रीत कौर असून विनिपेगमधील तिच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली.
पोलिस प्रशासनाने या घटनेचे अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली. सध्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २३ जून रोजी ही घटना घडली. तनप्रीत संध्याकाळी तिच्या कामावरुन घरी जात होती. यावेळी मध्यरात्रीनंतर रोझलिन रोडच्या १-९९ ब्लॉकजवळ तिच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केली. या हल्लेखोरांनी तनप्रीवर हल्ला केल्यानंतर तिचे सामान लुटले आणि तिथून पळ काढला.
विनिपेग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसपासच्या लोकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण या हल्ल्यात तनप्रीत गंभीर जखमी झाली. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी म्हटले की, तनप्रीतने हल्लेखोरांशी सामाना करताना चाकू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला सुरुच ठेवले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तिला वाचवले आणि ९११ ला माहिती दिली. परंतु पोलिस येण्यापूर्वी हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले होते. सध्या स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास देखील सुरु केला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हल्ला, दरोडा आणि इतर आरोप दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगतिले की घटनेदरम्यान तनप्रीतवर चाकूने तीव्र हल्ले करण्यात आले. यावेळी तिचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला.
गेल्या काही काळापासून कॅनडामध्ये भारतीयांविरोधात हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांच्या मते, खलिस्तानी समर्थकांचा यामध्ये समावेश आहे. परंतु कॅनडियन पोलिसांमध्येही खलिस्तानी समर्थकांबद्दल सहानुभूती आहे.