Israel Iran War Was Iran's nuclear project really destroyed Was the Israeli and American campaign successful
Israel Iran War news Marathi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२४ जून) इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. तसेच कोणत्याही पक्षाने याचे उल्लंघन करुन नये असेही ट्रम्प यांनी म्हटले. परंतु इराणने याला स्पष्ट नकार दिला. यानंतरही दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ले करतच आहेत. दोन्ही देशांनी मंगळवारी (२४ जून) सकाळी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब हल्ले केले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे युद्ध सुरु आहे. याचा उद्देश इराणच्या अणुप्रकल्पाला उद्ध्वस्त करणे होता.
यासाठी इस्रायलने १३ जून रोजी ऑपरेशन ‘रायझिंग लायन’ सुरु केले आणि इराणवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुशास्त्रज्ञांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलचा यामागचा हेतू इराणला अणुबॉम्ब बनवण्यासापासून रोखणे होता. इस्रायलने जोपर्यंत इराण आण्विक शस्त्रे बनवणे थांबवत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील असे म्हटले होते. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावरण होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर २२ जून रोजी अमेरिकेने देखील इस्रायलच्या समर्थनार्थ युद्धात सहभाग घेतला. अमेरिकेने शक्तिशाली बी-२ बॉम्बर्सचा वापर करुन इराणच्या बंकर बस्टरवर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे तीन प्रमुख नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहान या अणु सुविधा नष्ट झाल्याचा दावा केला.
तेहरानला त्यांचा अणु कार्यक्रम पुढे नेण्यास आता शक्य नाही असे त्यांनी म्हटले. पण खरंच इराणचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत का? खरंच इराण आता अणुबॉम्ब बनवून शकणार नाही ना? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
तर दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्याने इराणचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे. यामुळे इराणचा अणु कार्यक्रम थांबलेला नाही असे इराणच्या अणुउर्जा संस्थेच्या तज्ज्ञांनी सांगतिले आहे. इराणचे अमेरिकेच्या हल्ल्याने नेमके किती नुकसान झाले आहे याबाबद देखील अद्याप अस्पष्टता आहे. हल्ल्यानंतर रेडिएशन उत्सर्जित झालेले नसल्याने इराणच्या अणु सुविधांना केवळ बाहेरुन नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणकडे ६०% समृद्ध युरेनियमचा साठा होता. परंतु हा साठा कोणाकडे हस्तांतरित केला गेला असेल याबाबतही माहिती नाही. यामध्ये रशियाचे नाव समोर येते आहे, कारण रशियाने इराणकडे युरेनियमच्या साठ्याची मागणी केली होती.
या १२ दिवसांच्या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधी कारवाई केली. परंतु इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यात दोघांना किती यश आले हे अद्याप अस्पष्ट आहे. इस्रायल आणि अमेरिकेचे उद्दिष्ट यशस्वी झालेले नाही असे दिसून येत आहे. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी देखील सुरुच आहे. मध्ये पूर्वेत परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे.