इराणचा इस्त्रायलवर भीषण हल्ला (फोटो- istockphoto)
Iran-Israel-USA: गेले दोन आठवडे इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने देखील यामध्ये उडी मारली आहे. काल रात्री उशिरा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. तसेच दोन्ही देशांत सीजफायर झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र इराण मागच्या काही तासांमध्ये इस्त्रायलवर अनेक मिसाईल्स डागली आहेत.
इराणने मागच्या 5 तासांमध्ये इस्त्रायलवर तीन ते चार वेळेस मिसाईल्स हल्ले केले आहेत. यातील एक मिसाईल्स रहिवाशी इमारतीवर पडले. त्यामुळे तिथे काहीसे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायरची घोषणा केल्यावर काही तासांतच झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय?
“सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदी झाली आहे,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले.तसेच ही युद्धबंदी पुढील सहा तासांत लागू होणार असून, सुरुवात इराणकडून होईल. इस्रायल १२ तासांनंतर औपचारिकपणे सामील होईल आणि एकूण २४ तासांनंतर युद्ध संपल्याचे अधिकृतपणे मानले जाईल.
अमेरिकेने असा दावा केला मात्र इराणने यासाठी नकार दिला आहे. कसलीही युद्धबंदी झाली नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. मागील काही तासांत इराणने इस्त्रायवर भीषण हल्ले केले आहेत. अनेक मिसाईल्स डागली आहेत. त्यामुळे खरोखर युद्धबंदी झाली आहे की नाही हा प्रश्न जगभरातील देश उपस्थित करत आहेत.
As Iran has repeatedly made clear: Israel launched war on Iran, not the other way around.
As of now, there is NO "agreement" on any ceasefire or cessation of military operations. However, provided that the Israeli regime stops its illegal aggression against the Iranian people no…
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) June 24, 2025
इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
इराणने कतारमधील अमेरिकन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीची घोषणा केली. इराणने दावा केला की कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करुन आम्ही इस्रायली हल्ल्याचा बदला घेतला आहे. परंतु कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हवेत हाणून पाडल्याचे म्हटले आहे. यामध्ये अमेरिकन तळाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे कतारने म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे बहुतेक हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी मदत माहतिली. दोन्ही देशांनी एकत्र येऊन शांततेसाठी मागणी केली. ट्रम्प यांनी म्हटले की, मला माहित होते की आता युद्धबंदीची वेळ आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. ही केवळ इस्रायल आणि इराणसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी दावा केला की, दोन्ही देश आता शांतता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करतील. दोन्ही देश यापुढे सत्य आणि नितिमत्तेच्या मार्गावर राहितील. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, युद्धबंदी सहा तासानंतर लागू होऊल इराण पहिल्यांदा १२ तासांत आपली शस्त्रे खाली ठेवेल आणि त्यानंतर इस्रायल १२ तासांत शस्त्रे खाली ठेवली.