Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद’ ; पंतप्रधान नेतन्याहू यांनी PM मोदींचे मानले आभार, कारण काय?

Israel PM Thanks PM Modi : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदींनी विरोध केला होता, यावर नेतन्याहूंनी आभार मानले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 09, 2025 | 02:35 PM
Israel PM Netanyahu thanks India for support after terror attack in Jeruselm

Israel PM Netanyahu thanks India for support after terror attack in Jeruselm

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलच्या पंतप्रधानांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
  • पंतप्रधान मोदींकडून इस्रायलमधील दहशवादी हल्ल्याचा निषेध
  • दहशतवाद संपूर्ण जगासाठी शाप – नेतन्याहू

Israeli PM Thanks PM Modi : जेरुसेलम : रविवारी (७ सप्टेंबर) इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू, तर १२ जखमी झाले होते. या हल्ल्याचे वर्णन करताना दहशतवादाला शाप असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले. यावेळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त केला, तसेच दहशतवादाविरोधा इस्रायलला भारताचा पाठिंबा असेल असेही म्हटले. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींची आभार मानले आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दहशतवादाविरोधात इस्रायलच्या पाठीशी राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंर्भात एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायलच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि आपल्या सर्वांसाठी धोका निर्माण करण्याऱ्या दहशतवादाच्या शापाविरुद्ध पाठींबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार.”

India-Israel Ties : भारत-इस्रायलमध्ये होणार मोठा अर्थिक करार! टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्पला 420 चा करंट

पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा निषेध

सोमवारी पंतप्रधान मोदींनी इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याला विरोध करत एक्सवर पोस्ट केली होती, याच पोस्टला नेतन्याहूंनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप नागरिंकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या होत्या. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, इस्रायलची राजधानी जेरुसेलममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. तसेच पीडीतांच्या कुटुंबीयांप्रतीही मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी ही प्रार्थना करतो. भारत सर्व प्राकराच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशवादाविरोधी धोरणावर ठाम राहतो.

Thank you Prime Minister @narendramodi for standing with Israel and against the scourge of terror that threatens us all. 🇮🇱🇮🇳 https://t.co/aeVC0hvG0Z

— Prime Minister of Israel (@IsraeliPM) September 8, 2025

हमासकडून हल्ल्याचे समर्थन

दरम्यान हमासने या हल्ल्याचे समर्थन केले असून याला एक मोठी आणि वीर कारवाई म्हटले आहे. हमासने त्यांच्या लोकांविरोधात सुरु असलेल्या गुन्ह्यांना आणि विनाशाला एक उत्तर प्रतिसाद असल्याचे म्हटले आहे. परंतु इस्रायलमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

FAQs (संबंधित प्रश्न) 

कुठे आणि कधी झाला हल्ला? 

रविवारी (०७ सप्टेंबर) इस्रायलच्या जेरुसेलममध्ये एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला होता. यामध्ये १२ जखमी झाले होते, सध्या यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच यात पाचजण ठार झाले आहेत. हा हल्ला जेरुसेलमच्या रामोट जंक्शनवर झाला होता.

कोणी केली हल्ला?

इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केला असून या हल्ल्यात अत्याधुनिक बंदूकांचा वापर करण्यात आला. दोन दहशतवाद्यांनी बसमधील प्रवाशांवर गोळीबार केला आणि फरार झाले.

Houthi Drone Strike : इस्रायलचे ‘मल्टिलेयर एअर डिफेन्स’ ठरले अपयशी; हुथी ड्रोनमुळे मोठा विध्वंस,पाहा VIDEO

 

 

Web Title: Israel pm netanyahu thanks india for support after terror attack in jeruselm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन
1

Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन

मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2

मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

4 अपत्य असतील तर TAX लागणार नाही, लोकसंख्येबाबत चिंतेत असणाऱ्या पंतप्रधानांची मोठी घोषणा, मिळणार १,६००,०००,००० रुपयांची मदत
3

4 अपत्य असतील तर TAX लागणार नाही, लोकसंख्येबाबत चिंतेत असणाऱ्या पंतप्रधानांची मोठी घोषणा, मिळणार १,६००,०००,००० रुपयांची मदत

Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी
4

Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.