
Israeli Attack On Refugee Camp In Southern Lebanon
लेबनॉनवर इस्रायलचा घातक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील पॅलेस्टिनींच्या ऐन अल-हिलवेहल छावणीला लक्ष करण्यात आले आहे. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाहतील (Hezbollah) युद्ध गेल्या काही महिन्यांपासून थंडावले होते, परंतु पुन्हा एकादा दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला आहे.
मंगळवारी (१८ नोव्हेंबर) हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनमधील माध्यमांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती देताना हा हल्ला सर्वात घातक हल्ला असल्याचे वर्णन केले. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचेही सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळए सध्या दक्षिण लेबनॉन परिसरातील पॅलेस्टिनींमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सध्या या हल्ल्यानंतर छावणीमध्ये गोंधळ उडाली आहे. परिसरातील रहिवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. परंतु पॅलेस्टिनींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. तसेच हमासने (Hamas) देखील सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना आत जाण्यापासून रोखले आहे. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेकजणांचा प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर इस्रायलची प्रतिक्रिया दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलने दावा केला आहे की, त्यांनी कोणत्याही नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलेल नाही, तर हमासच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला आहे. ऐन अल-हेलविहल छावणीमध्ये हमास लोकांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत होता असे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, जिथे हमासचे सैन्य दहशतवादी कुरघोड्या करताना दिसेल तिथे त्यांच्यावर हल्ला केला जाईल.
Ans: इस्रायलने गाझाच्या दक्षिण लेबनॉनमध्ये ऐन अल-हिलवेहला छावणीवर घातक हल्ला केला आहे.
Ans: इस्रायलने गाझाच्या दक्षिण लेबनॉनमध्ये ऐन अल-हिलवेहला छावणीवर केलेल्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू आणि अनेक गंबीर जखमी झाले आहेत.
Ans: दक्षिण लेबनॉनमधील हल्ल्यावर स्पष्टीकरण देताना इस्रायलने दावा केला की, ऐन अल-हिलवेहला छावणीमध्ये हमासकडून लोकांना दहशवादाचे प्रशिक्षण दिले जात होते. यामुळे त्यांनी हमासविरोधी हल्ला केला आहे, कोणत्याही नागरिकांवर नाही.