Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; आरोपी संबंधी महत्त्वाची माहिती उघड

अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री (२१ मे) इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2025 | 09:30 PM
Israeli embassy employees murder case is related to the deaths of Palestinians in Gaza

Israeli embassy employees murder case is related to the deaths of Palestinians in Gaza

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री (२१ मे) इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणासंबंधी आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संबंधित प्रकरणात वॉशिंग्टन डीसीच्या पोलिसांनी संशयिताल अटक केली आहे. या आरोपीचे नाव एलियास रॉड्रिग्ज आहे. या हल्ल्यावेळी एलियासने फ्री पॅलेस्टिनीच्या घोषणा दिल्या होती. बुधवारी २१ मे च्या रात्री वॉशिंग्टन डी. सी. येथील यहूदी संग्रहालयाजवळ ही घटना घडली. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात यारोन लिस्चिंस्की आणि सारा लिन मिलग्रिम हे दोनइस्रायली दूतावासाचे कर्मचारी मारले गेले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी? नागरिकांच्या हत्येमुळे नेतन्याहू झाले संतप्त, म्हणाले…

घटनेनंतर मोठा खुलासा

या घटनेनंतर आरोपीने मोठा खुलासा केला आहे. आरोपी रॉड्रिग्जने एका कथित मॅनिफेस्टोचा खुलासा केला आहे. या हल्ल्याचा संबंध गाझातील पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूशी असल्याचे आरोपीने म्हटले आहे. या मॅनिफेस्टोनुसार, गाझातील हत्याकांडामुळे आरोपी दु:खी झाला होता. यामुळे इस्रायलकडून पॅलेस्टिनींनवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांविरोधात तो संतप्त झाला. त्याने म्हटले की, गेल्या काही महिन्यात इस्रायलच्या हल्ल्यात हजारो लोकांच्या मृत्यू झाला, याची गणना करणे देखील कठीण आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५० हजारांहून अधिक लोक मारले गेले आणि अद्याप हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे.

The suspect in the shooting of two Israeli embassy staffers has reportedly written a manifesto, (linked below) framing the act as political protest against “our brutal conduct in Palestine.” The suspect has been identified as Elias Rodriguez, a 30-year-old man from Chicago. — WikiLeaks (@wikileaks) May 23, 2025

आरोपीने सोशल मीडियावरही अमेरिकेचा नाश व्हावा, इस्रायलचा अंत व्हावा अशी यहूदीविरोधी पोस्ट केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. यावरुन हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. आरोपी रॉड्रिग्ज हा शिकागोमध्ये पार्टी फॉर सोशलिजम ॲंड लिबरेशन (PSL) या डाव्या विचारसणीच्या संघटनेशी जोडलेला आहे. परंतु या घटनेनंतर संघटनेने स्पष्ट केले की, २०१७ साली त्यांनी आरोपी रॉड्रिग्जशी संबंध तोडले होते. तसेच हा हल्ला हमास संबंधी असल्याचेही म्हटले जात आहे.

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडे योग्य न्यायाची मागणी केली होती. दरम्यान हा हल्ला राजकीय उद्देशाने घातक असल्याचे मानले जात आहे.सध्या या घटनेची सखोल चौकशी सुरु आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत इस्रायल दूतावासच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; आता सर्वांच्या नजरा ट्रम्प यांच्या भूमिकेवर

Web Title: Israeli embassy employees murder case is related to the deaths of palestinians in gaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • America
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.