गेल्या तीन महिन्यापासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Isrel Hamas War)सुरू आहे. या युध्दात आतापर्यंत 25000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही इस्रायल आणि हमासमधला तणाव काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायलने कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांच्या माध्यमातून हमासला दोन महिन्यांपर्यंतच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. या बदल्यात हमासला सर्व ओलिसांची सुटका करावी लागेल असं म्हण्टलं आहे.
[read_also content=”राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानं रचला विक्रम, ठरला YouTu वर सर्वाधिक पाहिला जाणारा लाइव्हस्ट्रीम, मिळाले तब्बल ‘इतके’ व्हूज! https://www.navarashtra.com/latest-news/ram-mandir-inaguration-by-narendra-modi-becomes-youtube-most-watched-livestream-nrps-500834.html”]
इस्रायली युद्ध मंत्रिमंडळाने अलीकडेच पॅलेस्टिनी गट हमाससोबत ओलिस कराराच्या नवीन प्रस्तावाच्या मापदंडांना मंजुरी दिली आहे, असे अहवालात म्हटले आहे. हे प्रस्ताव हमासने नाकारलेल्या सौद्यांच्या पूर्वीच्या पैलूंपासून वेगळे असल्याचे म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये अजूनही 130 हून अधिक ओलीस ठेवण्यात आले आहेत.
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1300 इस्रायली मारले गेले. हमासने 240 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली होती. आतापर्यंत 109 ओलिसांची हमासने सुटका केली आहे. अजूनही 130 हून अधिक लोकांना हमासने ओलीस ठेवले असल्याचे बोलले जात आहे. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात 25,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास संचालित पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.






