Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Italy News : इटलीत महागाईविरोधात जनक्षोभ ; ४० हून अधिक शहरांत हजारोंचे आंदोलन

Italy News : इटलीमध्ये वाढती महागाई आणि लष्करी खर्चाविरोधात हजारो नागरिकांनी ४० हून अधिक शहरांत निदर्शने केली. आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक निधी देण्याची मागणी करण्यात आली. ट्युरिन, रोम आणि मिलानमध्ये आंदोलक-पोलिसांमध्ये संघर्ष झाला. देशभर २४ तासांचा संपही पुकारण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 31, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • महागाई विरोधात कामगार आणि विद्यार्थ्यांचा एल्गार
  • अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष
  • शस्त्रांच्या वाहतुकीलाही विरोध
  • देशव्यापी संपामुळे जनजीवनावर परिणाम
Italy News : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे . यामुळे इटलीमध्ये सरकारविरोधात मोठा जनक्षोभ उसळला आहे . वाढता राहणीमानाचा खर्च , अपुऱ्या सार्वजनिक सुविधा आणि लष्करी खर्चात सतत होणारी वाढ याविरोधात हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत .

शुक्रवारी ( ३० ऑक्टोबर ) देशभरातील ४० हून अधिक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली . आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी सरकारी गुंतवणूक वाढवावी , तसेच संरक्षक क्षेत्रावरील वाढता खर्च कमी करून नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य द्यावे , अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे .

महागाई विरोधात कामगार आणि विद्यार्थ्यांचा एल्गार

या आंदोलनात विद्यार्थी , कामगार आणि सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत . USB या कामगार संघटनेने २४ तासांच्या देशव्यापी संपाचे आवाहन केले होते . वाढत्या इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमुळे सामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे . दुसरीकडे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला . सरकारने युद्ध आणि लष्करी तयारीवर खर्च करण्याऐवजी नागरिकांच्या कल्याणासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा , अशी मागणी करण्यात आली आहे .

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष

निदर्शनांदरम्यान काही शहरांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली . ट्यूरिनमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला . रोममध्ये आंदोलकांनी कचऱ्याच्या डब्ब्यांना आग लावली . तर संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी रोखले . या प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले . मिलानमध्ये आंदोलकांनी मुख्य रस्त्यांवर उतरून वाहतूक विस्कळीत केली .

Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती

शस्त्रांच्या वाहतुकीलाही विरोध

जेनोआ बंदरात सुमारे १५ हजार कामगार , विद्यार्थी आणि आंदोलक सहभागी झाले होते . बंदरांचा वापर शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी केला जात असल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला . युद्धामुळे होणारी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली . या आंदोलनातून इटलीतली नागरिकांच्या सरकारच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक धोरणांबद्दलचा वाढता असंतोष स्पष्ट झाला आहे .

देशव्यापी संपामुळे जनजीवनावर परिणाम

USB कामगार संघटनेने पुकारलेल्या २४ तासांच्या देशव्यापी संपात कामगार ,विद्यार्थी , शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील कर्मचारी सहभागी झाले . वाहतूक अंडी सार्वजनिक सेवांवरही या संपाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली . सरकारने नागरिकांच्या आर्थिक अडचणींकडे लक्ष देऊन वेतनवाढ , महागाई नियंत्रण आणि सार्वजनिक सेवांसाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा , अशी आंदोलकांची मागणी आहे .

Web Title: Italy news mass protests cost of living crisis military spending 40 cities cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Italy
  • Marathi News
  • Protest

संबंधित बातम्या

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
1

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
2

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर
3

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
4

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.