Sheikh Hasina sentenced to jail for six months
Bangladesh News Marathi: ढाका : एक मोठा बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिरणाने बुधवारी (७ जुलै) हा निर्णय जाहीर केला आहे. हसीना आणि स्थानिक नेते शकील बुलबुल यांच्यातील संभाषणाच्या चौकशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेशच्या क्राइम ट्रिब्युनलचे न्यायमुर्ती मोहम्मद गुलाम मुर्तझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. शेख हसीना यांच्यासह बांगलादेशचे स्थानिक रहिवासी शकील बुलबुल यांनी देखील न्यायालयाच्या अवमान प्रकरणांतर्गत दोन महिन्याच्या तुरुंवासाठची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. त्याचा अवामी लीगच्या विद्यार्थी शाखेशी संबंधित प्रकरणात सहभाग आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी हसीना आणि शकील बुलबुल यांचा एक कथित कॉलचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. या ऑडिओ क्लिपमध्ये शेखी हसीना यांनी त्यांच्याविरोधात २२७ लोकांना मारल्याचा खटला चालु आहे, यामुळे त्यांना या लोकांना ठार करण्याचा परवाना मिळाला आहे, असे म्हटले होते. या ऑडिओमुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली होती.
सरकारी वकिलांनी हे व्यक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे म्हटले. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे. याअंतर्गत शेख हसीना आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना कठोर शिक्षा सुनावण्यात यावी असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी ट्रिब्युलनसमोर मांडला. देशातील अनेक मोठ्या आंदोलनांशी संबंधित खटल्यांमध्ये सहभागी असलेलेल्या लोकांना आंदोलकांना धमकवण्याचा प्रयत्न हसीना यांनी केला असे सरकारी वकिलांनी म्हटले. यानंतर न्यायालयाच्या तीन खंडपीठाने शेख हसीना यांनी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये शेख हसीनायांच्या घरावर विद्यार्थी आंदोलकांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्या देश सोडून भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. तेव्हापासून त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात त्यांच्याविरोधात अनेक खेळी खेळल्या गेल्या आहेत. सध्या त्यांना न्यायालयाने सहा महिन्यांच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे शेख हसीना यांनी मोठा धक्का बसला आहे.