ब्रिटनच्या इमिग्रेशन धोरणांमध्ये बदल; भारतीयांवर होणार परिणाम? जाणून घ्या नवीन नियमावली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लंडन : ब्रिटनच्या इमिग्रेशन धोरणांमध्ये पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीने सरकारने इमिग्रेशन धोरणांत नव्या सुधारणा केल्या आहेत. २२ जुलै २०२५ पासून हे नवीन नियम लागू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान केयर स्टारमर यांनी तेली आहे. त्यांनी ब्रिटनच्या इमिग्रेशन धोरणात बदल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. मात्र या धोरणांमुळे परदेशी कामगारांवर मोठा परिणाम होणार आहे, विशेष करुन भारतीय कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ब्रिटनच्या या नव्या धोरणामुळे देशात चार पटीने वाढलेलेल्या स्थालांरितांमध्ये संतुलन येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वीच्या सरकारच्या धोरणामुळे परदेशी कामगारांवर देश अवलंबून होता, यामुळे देशांतर्गत कामगारांना कमी संधी प्राप्त झाल्या. परंतु आता यामध्ये संतुलन निर्माम होईल असे त्यांचे म्हणणे आहे. आज आपण ब्रिटनच्या नव्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या नेतृत्त्वाखाली चार मुख्य बदल करण्यात आले आहेत.
दरवर्षी हजारो भारतीय वर्क व्हिसा, हेल्थ व्हिसा किंवा स्टडी व्हिसावर ब्रिटनमध्ये जातात. मात्र या नवीन धोरणांच्या अटींनुसार आता भारतीयांसाठी कमी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे NHS आणि केअर विभागात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता व्हिसा मिळणे कठी होणार आहे. सध्या शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना यादीतून बाहेर काढण्यात आले आहे, परंतु भविष्यात यासाठी देखील संधी कमी होण्याची शक्यता आहे.