
pakistan gul plaza fire
पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO
मिडिया रिपोर्टनुसार, १७ जानेवारीच्या रात्री सुमारे १० वाजता गुल प्लाझा मॉलला आग लागली होती. ही आग जवळपास ३४ तासानंतर विझवण्यात यश मिळाले आहे. या आगाती आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८१ जण अजूनही बेपत्ता असून लष्कर, रेंजर्स आणि नागरी प्रशासनाच्या मदतीने त्यांचा शोध सुरु आहे. आगीमुळे इमारती कोसळली असून मोठ्या प्रमाणात मलब्यांचे ढिगारे साठले आहेत.यामुळे आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. सध्या या घटनेने कराचीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या या लोकांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. मतहेद जळाले असल्याने डीएन चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे. यासाठी १८ पीडीतांच्या नातेवाईकांनी डीएनचे नमुने जमा केले आहे. यातील सहा जणांचीच ओळख पटली आहे.
दरम्यान गुल प्लाझा जवळील रम्पा प्लाझा इमारत बंद करण्यात आली आले आहे. तसेच आपासचा परिसर बंद करण्यात आला आहे.घटनास्थळी केवळ बचाव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. मलबे हटवण्याचे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. तसेच बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांनी डीसी ऑफिस हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक सरकारने केले आहे.
शनिवारी (१७ जानेवारी) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अनेकजण दुकाने बंद करुन घरी जाणाच्या तयारीत होती. याच वेळी ही आग लागली.बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदामात आग लागली होती. या ठिकाणी कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू आणि काही ज्वलशील पदार्थ होते. यामुळे ही आग प्रचंड वाढली.आगीने संपूर्ण मॉलला विळख्यात ओढले. दावा केला जात आहे की, इमारतीमधून बाहेर पडण्याचे आपत्कालीन मार्ग बंद होते यामुळेच लोक आतमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला.
ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर
Ans: कराचीतील गुल प्लाझा मॉलच्या आगीत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: शनिवारी १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास कराचीतील गुल प्लाझा मॉलला आग लागली होती.
Ans: गुल प्लाझा मॉलच्या आगीत अजून 81 जण बेपत्ता आहेत
Ans: कराची मॉलला लागलेल्या आगीत बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु आहे. यासाठी लष्कर, रेंजर्स आणि नागरी प्रशासनाच्या मदत घेतली जात आहे. तसेच मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचमी केली जात आहे.