भारतीय सेना प्रमुख, जनरल उपेंद्र द्विवेदी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट आणि कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सीमापार दहशतवाद अजूनही सक्रिय असून भारताची यावर बारकाईने नजर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या ८ दहशतवादी तळे पुन्हा सक्रिय झाली आहेत. यातील दोन तळे आंतरराष्ट्रीय सीमांजवळ आहेत, तर ६ तळे ही नियंत्रण रेषेजवळ (LoC) आहेत. या तळांमध्ये १०० हून अधिक दहशतदवादी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे भारतीय सैन्य हाय अर्लटमोडवर आले आहे.
दरम्यान जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की, भारताची या सर्व लष्करी तळांवर बारकाईने नजर असून कोणतीही घुसखोरी, दहशतवादी हालचाल किंवा भडकाऊ कारवाई झाली तर भारत शांत बसणार नाही. भारत पाकिस्तानविरोधात योग्य ती कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. द्विवेदी यांनी भारताच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे म्हटले आहे.
जनरल द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या या मोहिमेला लष्कराची मोठी धोरणात्म कामगिरी असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी याचा उल्लेख करत ही कारवाई तर केवळ एक ट्रेलर होता, परंतु पुन्हा भारताविरोधी कोणतीही दहशतवादी हालचाल झाल्यास भारत त्याला आणखी जोराने प्रत्युत्तर देईल असेही स्पष्ट केले आहे. भारताने २२ एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack) विरोधात ७ ते १० मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली होती. या कारवाईने पाकिस्तानला पळता भूई झाली होती. परंतु तरीही पाकिस्तान (Pakistan) सुधारलेला नसून जम्मूच्या परिसरात पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या आहेत.
भारत-पाकिस्तान DEMO चर्चा
याशिवाय भारताच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली होती. यावेळी पाकिस्तानने भारताकडे युद्धबंदीसाठी विनंती केली होती. याविनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्कराच्या DEMO मध्ये चर्चेचा उल्लेखही द्विवेदी यांनी केला. यामध्ये केवळ सीमाभागातील सैन्य तैनाती कमी करण्यावर चर्चा झाली होती. अण्वस्त्रांबाबत कोणताही उल्लेख नव्हता.
Ans: पाकिस्तानला भारतीय लष्करप्रमुखांनी थेट आणि कडक इशारा दिला आहे की, भारताविरोधी कोणतीही घुसखोरी, दहशतवादी हालचाल सीमापार जाणवली तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असे म्हटले आहे.
Ans: भारताच्या रडारवर सध्या पाकिस्तानमधील ८ दहशतवादी तळे पुन्हा सक्रिय झाली आहेत. यातील दोन तळे आंतरराष्ट्रीय सीमांजवळ आहेत, तर ६ तळे ही नियंत्रण रेषेजवळ (LoC) आहेत.






