
Khaleda Zia Health Update
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia व्हेंटिलेटरवर; प्रकृती अत्यंत चिंताजनक
खालिदा झिया (Khaleda Zia) यांच्या बांग्लादेश नॅशनला पार्टीने BNP ने दिलेल्या माहितीनुसार, खालिदा झिया यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्या आजारांमुळे त्यांना छातीत संसर्ग झाला होता. यामुळे त्यांच्या हृदयावर आणि फुफ्फुसावर परिणाम झाले आहे. BNP ने दिलेल्या माहितीनुसार, खालेदा जिया यांना उपचारासाठी लंडनला नेण्यात येणार आहे.
सध्या यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CAAB) ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (9 डिसेंबर) रात्री 9 वाजता खालिदा जिया यांना एअर ॲम्ब्युलन्सने लंडनला नेण्यात येणार आहे. खालिदा जिया यांच्या उपचारासाठी कतार सरकाकडून एअर अम्ब्युलन्सची व्यवस्था केली जात आहे. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षा गेल्या दोन आठवड्यापासून ढाकातील रुग्णालयात उपाचार घेत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांच्या कुटुंबीय सध्या चिंतेत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच खालिदा जिया यांच्या प्रकृती बद्दल समजताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) चिंता व्यक्त केली होती. त्यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले होते की, बांगलादेशच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांची प्रकृती जाणून चिंता वाटत आहे. आम्ही त्यांच्या पुन्हा लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी खालिदा जिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी जनतेला खालिदा यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. खालिदा जिया या १९९१ च्या निवडणुकीत विजयी होऊन बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या. त्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या कट्टर शत्रू मानल्या जातात. दोन्ही महिला नेत्यांमध्ये देशाच्या निवडणुकींदरम्यान चुरशीची लढाई झाली होती. त्यांच्या लढाईला बेगमांची लढाई म्हटले जायचे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर; PM मोदींनी केली चिंता व्यक्त