Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Assassination: खामेनींच्या हत्येचा ‘खलनायक’ सौदी अरेबिया? ट्रम्प आणि MBS यांच्यातील ‘गुप्त’ फोन कॉलने चर्चेला उधाण

Khamenei Assassination : वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सच्या आदेशावरून अमेरिकेने ही कारवाई सुरू केली. क्राउन प्रिन्सने या प्रकरणाबाबत ट्रम्प यांना अनेक फोन केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 10:03 AM
khamenei assassination saudi crown prince mbs donald trump washington post claim

khamenei assassination saudi crown prince mbs donald trump washington post claim

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदीचा मास्टरप्लॅन
  • ट्रम्प यांना अनेक फोन
  • अचूक टार्गेट

Washington Post report on Khamenei assassination : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या हत्येनंतर आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अमेरिकेने केलेली ही कारवाई केवळ स्वबळावर नव्हती, तर त्यामागे सौदी अरेबियाचा मोठा मेंदू आणि प्रभाव होता, असा खळबळजनक दावा प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे. या अहवालानुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वारंवार फोन करून इराणवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले. या खुलाशामुळे आता मध्यपूर्वेतील सुन्नी-शिया संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

MBS आणि ट्रम्प यांच्यातील ‘ती’ गुप्त चर्चा

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन गुप्तचर संस्था सुरुवातीला थेट खामेनींना लक्ष्य करण्याच्या बाजूने नव्हत्या. मात्र, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांना पटवून दिले की, “हल्ल्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.” जर आता इराणला रोखले नाही, तर भविष्यात तेहरान अण्वस्त्रांनी सज्ज होऊन सौदी अरेबियाच्या तेल सुविधांना आणि जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरेल. MBS यांनी ट्रम्प यांना विश्वास दिला की, इराणची राजवट बदलल्याशिवाय या प्रदेशात शांतता येणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

हत्येची वेळ आणि ‘इन्सायडर’ माहिती

दुसरा मोठा खुलासा हत्येच्या वेळी झालेल्या हालचालींशी संबंधित आहे. खामेनी जेव्हा त्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार अली शामखानी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपौर यांच्यासोबत एका गोपनीय बैठकीत व्यस्त होते, तेव्हाच अमेरिकेने अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. ही माहिती इतकी अचूक कशी होती, यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सौदी अरेबियाच्या सुरक्षा दलांनी आणि गुप्तचर यंत्रणांनी अमेरिकेला ‘ग्राऊंड लेव्हल’ माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. जानेवारी २०२६ मध्ये सौदी संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांची व्हाईट हाऊस भेट ही याच कटाचा भाग होती, असेही आता बोलले जात आहे.

🚨BREAKING Saudi Crown Prince Mohammed bin Salman privately urged President Trump multiple times to launch military strikes on Iran, according to a Washington Post report—despite his public calls for diplomacy. This lobbying, alongside pressure from Israel, contributed to the… pic.twitter.com/MVRWzjDreW — World NEWS (@WorldInsightsNW) March 1, 2026

credit – social media and Twitter

सौदी-इराण संघर्षाचा जुना इतिहास

सौदी अरेबिया (सुन्नी बहुल) आणि इराण (शिया बहुल) यांच्यातील वैर दशकांनुवर्षे जुने आहे. १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. येमेनमधील हुथी बंडखोर असोत की लेबनॉनमधील हिजबुल्लाह, इराणने नेहमीच सौदीच्या हितसंबंधांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे. १९८८ च्या हज दुर्घटनेत ४०० इराणी यात्रेकरूंच्या मृत्यूनंतर तर हा वाद शिगेला पोहोचला होता. सौदीला नेहमीच भीती होती की इराण आपला तेल व्यापार नष्ट करेल, म्हणूनच या ‘सर्वात योग्य संधी’चा फायदा घेत त्यांनी अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च नेत्याचा काटा काढायला लावला, असा दावा अहवालात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-Israel War 2026: तेहरानमध्ये स्मशान शांतता! खामेनींचा मृतदेह सापडला; इस्रायली हल्ल्यात ‘हे’ मुख्य 7 सर्वोच्च अधिकारीही संपले

जगावर काय परिणाम होणार?

सौदी अरेबियाने या अहवालावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जर हा दावा खरा ठरला, तर इराणचा उरलेला लष्करी गट (IRGC) आता थेट सौदी अरेबियाच्या तेल विहिरींना आणि रियाधला लक्ष्य करू शकतो. ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे की ते इराणमध्ये नवीन सरकार आणणार आहेत. मात्र, या प्रक्रियेत सौदीचा सहभाग उघड झाल्याने मुस्लीम जगतात मोठी दरी निर्माण होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉशिंग्टन पोस्टने सौदी क्राउन प्रिन्सबद्दल काय दावा केला आहे?

    Ans: अहवालानुसार, मोहम्मद बिन सलमान यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वारंवार फोन करून इराणवर आणि खामेनींवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

  • Que: खामेनी यांच्या हत्येच्या वेळी त्यांच्यासोबत कोण होते?

    Ans: हत्येच्या वेळी खामेनी त्यांचे सल्लागार अली शामखानी आणि IRGC प्रमुख मोहम्मद पाकपौर यांच्यासोबत बैठक करत होते.

  • Que: सौदी अरेबियाला इराणवर हल्ला का हवा होता?

    Ans: इराण भविष्यात अण्वस्त्रांनी सज्ज होऊन सौदीच्या तेल व्यापाराला आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण करेल, अशी भीती सौदीला होती.

Web Title: Khamenei assassination saudi crown prince mbs donald trump washington post claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Iran Attack
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता
1

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
2

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले
3

Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार; जीवितहानी अन् निष्पापांच्या किंकाळ्यांनी युक्रेन हादरले

अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका
4

अमेरिका-इराणमधील चर्चा ठरल्या निष्फळ, तणाव वाढला; होर्मुझ नाकेबंदीचा सर्वांना बसणार फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.