
khamenei 14 year old granddaughter coffin
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगी, जावई आणि इतर कुटुंबायही मरण पावले होते. यामध्ये एका १४ महिन्यांच्या चिमुकलीचाही बळी गेला होता. या सर्वांचे मृतदेह राष्ट्रीय सन्मानाने ग्रँड मोसल्ला येथे ठेवण्यात आले आहेत. चिमुकलीच्या शवपेटीजवळी तिचा एक फोटोही ठेवण्यात आला आहे.
खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी इराणचे अनेक बडे नेते उपस्थित होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अनेक धर्मगुरु उपस्थित होते. खामेनेईंना श्रद्धांजली अर्पण करताना या नेत्यांनाही गहिवरुन आल्याचे दिसून आले.
अयातुल्ला खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांचा दफनविधी मृत्यूच्या १३१ दिवसानंतर होत आहे. इस्लामिक परंपरेनुसार, २४ तासांच्या आता मृत व्यक्तीला दफन केले जाते. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान ०४ जुलै पासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. ०९ जुलै इराणमधील पवित्र मशहद शहरात खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबीयांना दफन करण्यात येणार आहे.
One of the most heartbreaking scenes out of Iran today:
Imam Khamenei’s 14-month-old granddaughter, Zahra Mohammadi Golpayegani, in a small coffin. pic.twitter.com/kIcZiwn3UV — Iran Screenshot (@iranscreenshot) July 3, 2026
या हल्ल्यात खामेनेई यांचे धाकटे सुपुत्र मोजतबा खामेनेई थोडक्यात बचावले. त्यांना हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून ते सध्या गुप्त ठिकाणी उपचार घेत आहे. त्यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. परंतु ते सार्वजनिकरित्या अद्याप समोर आलेले नाही. खामेनेईंच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित राहणार नाही. सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.