खामेनेईंच्या हत्येचा बदला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी अयातुल्ला हकीम इलाही यांनी याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मोजतबा खामेनेई यांची अंत्ययात्रेत उपस्थितीची शक्यता कमी आहे. इस्लामिक पंरपरेनुसार त्यांना अंत्यप्रार्थचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. परंतु मध्यपूर्वेतील संघर्ष आणि इस्रायली हलल्यांमुळे संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना सार्वजिनिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराठी इराणमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या सुमारे १३१ दिवसानंतर म्हणजे ४ महिने आणि ९ दिवसांनी अंतिम यात्रा सुरु होत आहे.
०४ जुलै रोजी अंतिम यात्रेला सुरुवात होईल. यानंतर ९ जुलै २०२६ रोजी इस्लामिक परंपरनेनुसार अंतिम दफनविधी केला जाईल. तेहरान, कूम, इराकमधील काही धार्मिक स्थळे आणि अखेरीस मशहद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. इराणी सरकारने नागरिकांना मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
खामेनेईंच्या अंत्ययात्रेच्या पार्श्वभूमीवर इराणने देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. काही भागांमध्ये हवाई क्षेत्रांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहे. संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता सरकार सतर्क आहे.
याच वेळी इराणने अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा दिला आहे. या काळात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई टाळण्याचे म्हटले आहे. अत्यंविधीदरम्यान कोणताही हल्ला किंवा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






