iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
iQOO 15R च्या टिझरवरून असा अंदाज लावला जात आहे की, या डिव्हाईसमध्ये चेकर्ड पॅटर्न, मेटल फ्रेम आणि डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग देखील ऑफर केली जाऊ शकते. iQOO 15R डिझाईन स्पोर्टी आणि रग्ड यूजर्ससाठी परफेक्ट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz हाय रिफ्रेश रेट असू शकतो. स्मार्टफोनचा डिस्प्ले 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्टसह येणार आहे. Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट आणि 6200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते.
परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर iQOO 15R स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तर या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेमिंग आणि मल्टी टास्किंग अगदी सहज पूर्ण होऊ शकते. Motorola Signature मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर आहे, जो 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येतो. हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग हे कॉम्बिनेशन देखील पावरफुल मानले जात आहे.
iQOO 15R स्मार्टफोन 7,600mAh बॅटरी पावरसह लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. यामुळे यूजर्सना दिर्घकाळ बॅटरी बॅकअप मिळतो. Motorola Signature मध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO 15R मध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा दिला जाण्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर सेकेंडरी कॅमेरा 8MP आणि फ्रंट कॅमेरा 32MP असू शकतो. तर Motorola Signature मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 100x पेरिस्कोप जूम आणि अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे. सेल्फी लवर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
iQOO 15R डिव्हाईस अँड्रॉईड 16 आधारित OriginOS 6 सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कस्टमाइजेशन आणि एडवांस फीचर्स दिले जाणार आहे. Motorola Signature स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित Hello UI वर चालतो. कंपनी 7 वर्षांच्या ओएस आणि सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन देत आहे, ज्यामुळे ते दीर्घकालीन वापरासाठी उत्तम बनते.
Motorola Signature स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आला असून डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. तर iQOO 15R फ्रेबुवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे, ज्याची किंमत सुमारे 45,000 रुपये असू शकते.






