Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन महिलांना घरीच करावा लागतोय गर्भपात; काय आहे नेमका मुद्दा?

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर बंदी घातली आणि राज्यांना स्वतःच्या कायद्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य दिले. तेव्हापासून मोठा बदल झाला आहे. 19व्या शतकात अमेरिकेत सामान्य कायद्यानुसार गर्भपाताला परवानगी होती. पण ज्यावेळी गर्भात हालचाली दिसू लागतील तेव्हा या गर्भपाताला मनाई होती. गर्भपाताच्या विरोधात कायदा आणण्यात कॅथोलिक चर्चने मोठी भूमिका बजावली आहे.  

  • By अनुराधा धावडे
Updated On: Aug 05, 2024 | 02:27 PM
अमेरिकन महिलांना घरीच करावा लागतोय गर्भपात; काय आहे नेमका मुद्दा?
Follow Us
Follow Us:

अमेरिका : अमेरिकेत स्वत:हून गर्भपात करणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या गर्भपात बंदी कायद्यामुळे या महिलांना घरीच गर्भपात करण्याची वेळ ओढावली आहे. घरीच गर्भपात करण्याने कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते की महिलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून घरीच गर्भपात करणाऱ्या महिलांची  संख्या लाखात असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

जामा नेटवर्क ओपन जर्नल, अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या मासिकाच्या वतीने  गेल्या मंगळवारी एका सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.  दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर बंदी घातली आणि राज्यांना स्वतःच्या कायद्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य दिले. तेव्हापासून मोठा बदल झाला आहे. गर्भपातावर बंदी घालण्यात आली असली तरीही गर्भपात होतच आहेत आणि गेल्या दोेन वर्षात गर्भपाताची प्रकरणेही झपाट्याने वाढली आहेत.

संशोधकांनी सर्वेक्षणाच्या पहिल्या सहा महिन्यांत 7 हजार महिलांच्या गटांशी चर्चा केली, तर एक वर्षानंतर पुन्हा 7 हजार महिलांशी चर्चा करण्यात आली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांनी घरीच गर्भपात  करण्याची वेळ आल्याचे त्यांनी कबूल केले.  हे संशोधन एका छोट्या गटावर करण्यात आले असले तरी अशा महिलांची संख्या लाखात असू शकते, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

दोन वर्षांपूर्वी काय झाले

जून 2022 मध्ये, यूएस सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात मंजूर करणारा सुमारे पाच दशके जुना निर्णय रद्द केला. याआधीही 13 राज्यांनी गर्भपात विरोधी कायदे केले होते पण ते तितकेसे तसे कठोर नव्हते. अडचण आली तरी महिला इतर राज्यांतील हॉस्पिटलमध्ये जात असत. पण दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाने सगळेच बदलले. गर्भपाताला नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या चुकीचे ठरवत न्यायालयाने राज्यांना हवे तसे गर्भपातविरोधी कायदे कडक करण्याचे अधिकार दिले.

न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच गर्भपात दवाखाने बंद होऊ लागले. अगदी नियोजित गर्भपातही रद्द करण्यात आले. यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत गेली. आता परिस्थिती अशी आहे की, नको असलेली गर्भधारणा झाल्यास महिलांना घरच्या घरी गर्भपात करणे भाग पडते.

 ‘विशेष परिस्थितीत’ गर्भपात योग्य

अत्यंत आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या यूएसएमध्ये गर्भपातावर बराच काळ वादविवाद सुरू आहेत.  हा महिलांचा अधिकार आहे, न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. तर 40 टक्के लोक गर्भपातविरोध योग्य असल्याचे मानतात. गार्डियनच्या अहवालानुसार, सुमारे 85 टक्के लोकांनी काही विशिष्ट परिस्थितीत गर्भपात पूर्णपणे न्याय्य मानला.

अमेरिकेती निवडणुकीतील कळीचा मुद्दा

अमेरिकेच्या निवडणुकीतही हा मोठा मुद्दा मानला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गर्भपातविरोधाचे समर्थन करत आहेत.  तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिससह त्यांचा पक्ष हा कायदा हटवू इच्छित आहे. नोव्हेंबरमध्ये होणारा विजय-पराजयही यावरच ठरेल, असे मानले जात आहे.

गर्भात हालचाल झाल्यानंतर गर्भपात करण्यास मनाई

19व्या शतकात अमेरिकेत सामान्य कायद्यानुसार गर्भपाताला परवानगी होती. पण ज्यावेळी गर्भात हालचाली दिसू लागतील तेव्हा या गर्भपाताला मनाई होती. कॅथोलिक चर्चचा असाही विश्वास होता. गर्भपाताच्या विरोधात कायदा आणण्यात चर्चने मोठी भूमिका बजावली आहे.

 का आणला गेला गर्भपात विरोधी कायदा?

यामागे धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कारणे होती. कॅथोलिक धार्मिक श्रद्धेनुसार गर्भपात हा चुकीचा असल्याते मानतात. त्याच वेळी, अनेक गर्भपात विरोधी कार्यकर्ते याला जगण्याचा हक्क म्हणून पाहतात आणि याला न जन्मलेल्या मुलाविरुद्धचे षड्यंत्र मानले जाते. अमेरिकेतील पुराणमतवादी पक्षांच्या नेत्यांचाही यात सहभाग होता.

Web Title: Know the reason why american women have to have abortions at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर…
1

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर…

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का
2

US-Israel War: इराण युद्धसज्ज! ढिगाऱ्याखालून बाहेर काढला 1000 क्षेपणास्त्रांचा महाकाय खजिना; एक बुलडोझर अन् महासत्तेला धक्का

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला
3

War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध
4

Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.