Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य

Sadhguru : अमेरिकेतील इलिनॉय येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार करण्याच्या कथित कटाबद्दल सद्गुरूंनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी द्वेषपूर्ण विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि समाजाला एकत्र आणण्याच्या गरजेवर भर दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 18, 2026 | 04:34 PM
Sadhguru reaction on US Temple attack Sadhguru reaction on US Temple attack

Sadhguru reaction on US Temple attack Sadhguru reaction on US Temple attack

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील हिंदू मंदिरावर गोळीबाराचा कट उघड
  • सद्गुरूंची तीक्ष्ण प्रतिक्रिया
  • अतिरेकी विचारसरणी आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

अमेरिकेतील इलिनॉय येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा भयंकर कट उघडकीस आल्यानंतर जागतिक स्तरावर संतापाची लाट पसुरली आहे. या गंभीर घटनेवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू (Sadhguru) यांनी अत्यंत चिंता व्यक्त केली असून, वाढती द्वेषपूर्ण विचारसरणी आणि नव्या पिढीच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील पॅलाटाईन भागात असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार (Mass Shooting) करण्याचा एक मोठा कट अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिले की, “जेव्हा एखाद्या तरुणाचे आयुष्य द्वेषाने इतके विषारी होते की, तो स्वतःला वेगळे समजणाऱ्या निरपराध लोकांना मारण्याचा कट रचतो, तेव्हा हे स्पष्टपणे पुढच्या पिढीचे योग्य संगोपन करण्यात आपण समाज म्हणून अपयशी ठरल्याचे दर्शवते.”

तरुण पिढीतील वाढत्या द्वेषावर सद्गुरूंची संतप्त प्रतिक्रिया

अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील पॅलाटाईन भागात असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार (Mass Shooting) करण्याचा एक मोठा कट अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे उधळला गेला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिले की, “जेव्हा एखाद्या तरुणाचे आयुष्य द्वेषाने इतके विषारी होते की, तो स्वतःला वेगळे समजणाऱ्या निरपराध लोकांना मारण्याचा कट रचतो, तेव्हा हे स्पष्टपणे पुढच्या पिढीचे योग्य संगोपन करण्यात आपण समाज म्हणून अपयशी ठरल्याचे दर्शवते.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Italy Protests: No Meloni Day! फ्रान्स, स्पेननंतर इटलीतही उडाला आंदोलनाचा भडका; PM मेलोनी यांची आक्रमक भूमिका

असा उघडकीस आला भयंकर कट

ही धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी समोर आली, जेव्हा माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस विभागाला एका सजग नागरिकाकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या १९ वर्षीय तरुणाकडून काही अत्यंत आक्षेपार्ह आणि त्रासदायक इलेक्ट्रॉनिक संदेश मिळाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापोराकिसने एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याच्या कटाचा संपूर्ण दस्तऐवज आणि प्लॅन शेअर केला होता.

When a young life becomes so poisoned by hate that he plans to kill those he sees as different, it reflects our failure in nurturing the next generation. It is most important that we cultivate a sense of inclusion and work toward raising human consciousness. Our deep gratitude to those who acted promptly to prevent the Aurora attack. – Sg — Sadhguru (@SadhguruJV) October 16, 2026

credit – social media and Twitter

केवळ कागदोपत्री प्लॅनच नाही, तर या तरुणाने अत्याधुनिक रायफल, भरलेले मॅगझिन, बॉडी आर्मर आणि इतर सामरिक उपकरणांचे फोटोही पाठवले होते. माहिती मिळताच पॅलाटाईन पोलिसांनी माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांच्या मदतीने तात्काळ सूत्रे हलवली आणि पापोराकिस घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Italy Protests: No Meloni Day! फ्रान्स, स्पेननंतर इटलीतही उडाला आंदोलनाचा भडका; PM मेलोनी यांची आक्रमक भूमिका

संशयिताच्या घरातून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त

पापोराकिसला ताब्यात घेतल्यानंतर पॅलाटाईन पोलिसांच्या गुप्तहेरांनी त्याच्या घरावर शोध वॉरंट बजावले. घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा साठा सापडला. यामध्ये एक अत्याधुनिक रायफल, शेकडो जिवंत काडतुसे, अनेक भरलेली मॅगझिन, टॅक्टिकल वेस्ट, आणि बॉडी आर्मर जप्त करण्यात आले.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, झाडाझडती दरम्यान पोलिसांना श्वेतवर्णीय वर्चस्ववादी (White Supremacist) अतिरेकी विचारसरणीशी संबंधित काही वस्तू आणि पॅचेस सापडले. या साहित्यामध्ये विशेषतः दक्षिण आशियाई वंशाच्या आणि भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध द्वेष पसरवणारी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी विधाने लिहिलेली होती. आरोपीची ही मानसिक वृत्ती अत्यंत भयानक आणि धार्मिक द्वेषाने प्रेरित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कोर्टात हजेरी आणि गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मते, आरोपी पापोराकिस ११ ऑक्टोबर रोजीच अरोरा परिसरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्यावर दहशतवादी धमक्या देण्याचा (Class X Felony) आणि बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. न्यायाधीशांनी आरोपीची गांभीर्य लक्षात घेऊन त्याला जामीन नाकारत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पॅलाटाईनचे पोलीस प्रमुख विल्यम नॉर्ड यांनी सांगितले की, या घटनेचे गांभीर्य अत्यंत मोठे होते. पोलिसांनी एफबीआय (FBI) आणि इतर स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने अत्यंत वेगाने पावले उचलल्यामुळे एक मोठा रक्तपात टळला आहे. प्रार्थनास्थळांची सुरक्षा ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Web Title: Us hindu temple attack plot foiled illinois sadhguru reaction hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • America
  • Sadhguru Jaggi Vasudev
  • World news

संबंधित बातम्या

US Temple Attack : अमेरिकेतील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट उधळला; घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालय अन् एफबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये
1

US Temple Attack : अमेरिकेतील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट उधळला; घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालय अन् एफबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये

Portugal Protest: फ्रान्स, इटलीनंतर आता पोर्तुगाल पेटले; रोनाल्डोच्या मायदेशात घरांच्या वाढत्या किमतीविरोधात हजारो लोक रस्त्यावर
2

Portugal Protest: फ्रान्स, इटलीनंतर आता पोर्तुगाल पेटले; रोनाल्डोच्या मायदेशात घरांच्या वाढत्या किमतीविरोधात हजारो लोक रस्त्यावर

H1BVisa: ‘माझा शब्द चुकला पण…’; भारताठी ‘वेठबिगार’ वक्तव्यावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचे मोठे स्पष्टीकरण
3

H1BVisa: ‘माझा शब्द चुकला पण…’; भारताठी ‘वेठबिगार’ वक्तव्यावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचे मोठे स्पष्टीकरण

Italy Protests: No Meloni Day! फ्रान्स, स्पेननंतर इटलीतही उडाला आंदोलनाचा भडका; PM मेलोनी यांची आक्रमक भूमिका
4

Italy Protests: No Meloni Day! फ्रान्स, स्पेननंतर इटलीतही उडाला आंदोलनाचा भडका; PM मेलोनी यांची आक्रमक भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.