लष्कर कमांडरने ऑपरेशन सिंदूरसंदर्भात केला मोठा खुलासा, मुरीदकेबाबत पाकिस्तानचा पर्दाफाश (फोटो सौजन्य-X)
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दिलेला धक्का पाकिस्तान नेहमीच लक्षात ठेवेल. याचदरम्यान आता जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कमांडर इलियास काश्मिरी याने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवादी कमांडरने पाकिस्तानमध्ये एक मोठी कबुली दिली आहे. त्याने दावा केला आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आदेश थेट लष्करप्रमुखांनी दिले होते. नेमकं काय म्हटलं जाणून घेऊया…
ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या नुकसानाचे सत्य पाकिस्तानकडून लपवण्यात आले होते. परंतु अलीकडेच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी याने सत्य उघड केले. आता लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो मुरीदकेमध्ये झालेल नुकसान या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. भारतीय सैन्याने मुरीदकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आता, ती जागा पुन्हा बांधली जात आहे. लष्कर कमांडरने पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.
याचदरम्यान, लष्कर कमांडर कासिमचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाकिस्तानच्या खोट्या गोष्टी उघड करतो. कासिम म्हणाला, “मी सध्या मुरीदके येथील मरकझ-ए-तैयबा छावणीसमोर उभा आहे, जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान नष्ट झाला होता. त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. ही मशीद पूर्वीपेक्षा खूप मोठी असेल. येथून अनेक प्रमुख मुजाहिदीन उदयास आले आहेत.”
व्हिडिओमध्ये, कासिमने नष्ट झालेल्या मरकझ-ए-तैयबा छावणीचे दृश्य दाखवले, जे आता उद्ध्वस्त झाले होते. त्याने असेही उघड केले की याच ठिकाणी अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे, कासिमने एक नवीन ठिकाण देखील उघड केले जे दहशतवादी कारखाना उभारणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये कासिम म्हणाला, “आज १५ सप्टेंबर आहे. पाकिस्तानमध्ये दौरा-ए-सुफ्फा नावाचा हा एकमेव ठिकाण आहे जिथे दौरा-ए-सुफ्फा नावाचा कोर्स शिकवला जातो. याअंतर्गत दहशतवाद्यांना घोडेस्वारी, पोहणे आणि इतर क्रियाकलाप शिकवले जातात.
लष्कर आणि जैशच्या कमांडरनी नवीन दहशतवाद्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे उभारण्यात आली आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. पाकिस्तानने या दहशतवाद्यांना लपवणे सुरूच ठेवले आहे.