संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India in UN Council : पुन्हा एकदा पाकिस्तानचा (Pakistan) जागतिक स्तरावर पर्दाफाश झाला आहे. भारताने पुन्हा पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा बैठकीत फटकारले आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवादी पसरवत असल्याचा आणि त्याला झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने हेही स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या कृतींना स्वीकारले जणार नाही असे म्हटले आहे.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी, हरीश यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना लष्कर-ए-तैयबा(LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) तसचे यांसारख्या इतर दहशतवादी संघटना अफगाणिस्तानची भूमी वापरुन जगभरात अशांतता पसरवलत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
‘दिल्ली-मुंबई हल्ल्यांमागे मसूद अजहरचा हात’ ; जैशचा दहशतवाद्याने उगळले सत्य
याच वेळी भारताने ठामपणे सांगितले आहे की, पाकिस्तानच्या दहशतवादाला थारा देणे बंद करणे गरजेचे आहे, अफगाणिस्तानच्या हवाला आता त्यांना देता येणाार नाही. यामुळे भारताने जागितक समुदायाला एकत्र येऊन दहशतवादाचा नायनाट करण्याचे आवाहन केले आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, इस्लामिक स्टेट, अल-कायदा आणि इतक दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमध्ये पाया रोवू देऊ नये. हरीश यांनी सांगितले की, भारत अफगाणिस्तानमधील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तसेच भारत काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) सहभागी असलेल्या द रेझिस्टन्स फ्रेंटचा हल्ल्याचा तीव्र निषेध करतो असेही प्रतिनिधी हरीश यांनी स्पष्ट केले आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांना धर्माच्या नावाखाली मारण्यात आले होते.
India urged global action to ensure UN-listed terror groups like Pakistan-based Lashkar-e-Tayyiba and Jaish-e-Mohammed do not exploit Afghan soil for terrorism.
Ambassador Parvathaneni Harish stressed coordinated international efforts.#India | #UNSC | #Afghanistan | #Terrorism… pic.twitter.com/i5Sa8IiQxe— The Pioneer (@TheDailyPioneer) September 18, 2025
प्रतिनिधी हरीश यांनी म्हटले की, अफगणिस्तानातील प्रश्न सोडण्यावसाठी शिक्षा, निर्बंध किंवा दडपशाही पुरेशी नाही. यासाठी त्यांच्या चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच तेथील गुन्हेगारीला, दहशतवादाला आळा घालणे महत्त्वाचे आहे. हाच मार्ग अफगाणिस्तानमध्ये संतुलित वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य असल्याचे हरीश यांनी म्हटले.
याच वेळी बैठकीदरम्यान संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तान मिशनचे प्रमुखे रोजा ओटुवबायेवा यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण २०२१ नंतर सत्तापालट झाल्यापासून अद्यापही अफगाणिस्तानच्या तलिबान सरकारला भारतसह अनेक देशांनी मान्यता दिलेली नाही.
हरीश यांनी सांगितले की, सध्या भारत तालिबानच्या संपर्कात आहे. त्यांच्याशी सतत चर्चा करत आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर मुत्तकी यांच्याशीही चर्चा सुरु आहे.
भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला का फटकारले?
भारताच्या मते, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या नावाखाली जगभरात दहशतवाद लपवण्याचा आणि दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पाकिस्तानला भारताने सुनावले.
अफगाणिस्तानवर भारताची भूमिका काय आहे?
भारताने स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना केवळ शिक्षण देणे, किंवा त्यांच्यावर निर्बंध लादण्याची गरज नसून त्यांच्या चांगल्या कार्यांना प्रोत्साहन देणे आहे. यासाठी भारताची अफगाणिस्तानशी चर्चा सुुरु आहे.