'अफवा पसरवू नका' ; अफगाणिस्तानातील इंटरनेट बंदीच्या चर्चांना तालिबान सरकारने फेटाळले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल : गेले दोन दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) इंटरनेट बंदी करण्यात आली असल्याची चर्च सर्वत्र रंगली होती. पण बुधवारी (१ ऑक्टोबर) अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने इंटरबंदीच्या सर्व वृत्तांना फेटाळले आहे. तालिबानने या संदर्भात एक अधिकृत विधान जारी केले आहे. या विधानात अफगाणिस्तानमधील जुने फायबर-ऑप्टिक केबल्स खराब झाले असल्याने इंटरनेट बंद झाले असल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानने जारी केलेल्या निवेदनानुसार, जुने फायबर-ऑप्टिक केबल्स खराब झाले होते. यामुळे त्यांना बदलण्याचे कार्य सुरु होते. यामुळे इंटरनेट बंद झाले. इंटरनेट बंदीमुळे अफगाणिस्तानातील बॅंकिंग, वाणिज्य आणि विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. परंतु इंटरनेटवर बंदी घालण्यात आलेली नाही, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
Nepal Kumari : नेपाळने केली नव्या ‘कुमारी’ची निवड; जाणून घ्या कोण आहे अडीच वर्षांची ‘देवी’…
गेल्या महिन्यात तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांना दिलेल्या आदेशामुळे इंटरनेट बंदीच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु तालिबान सरकारने या अफवा फेटाळल्या आहेत. तालिबानने म्हटले की, आम्ही इंटरनेवर कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही, अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका असे तालिबान सरकारने आवाहन केले आहे.
यापूर्वी इंटरनेटला कंपनी नेटब्लॉक्सने एक अहवाला जारी केला होता. ज्यामध्ये सांगण्यात आले होते की, अफगाणिस्तानमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटी १४ टक्क्क्यांपर्यंत घसरली आहे. यामुळे अफगाणिस्तानात टेलिकॉम सेवांमध्ये अडथले येते आहे. याच वेळी असोसिएटेड प्रेसने देखील काबुलमधील,. तसेच पूर्व आणि दक्षिण भागातील नांगरहार, हेलमंडमधील त्यांच्या पत्रकारांशी संपर्क साधता येत नसल्याचे म्हटले होते. यामुळे अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट बंदीच्या अफवा पसरल्या होत्या.
शिवाय अफगाणिस्तानच्या नागरिकांनी इंटरनेट सेवा स्लो झाली असल्याच्या आणि कनेक्टिव्हिटी होत नसल्याच्या तक्रारीही केल्या होता. यामुळे अनेक मुलांचे ऑनलाइन क्लासेस मध्ये अडथळा आला होता. तसेच देशात बॅंकिंग आणि ई-कॉमर्सवरही परिणाम झाला असल्याचे सांगितले जात होते. यामुळे अफगाणिस्तानमधील इंटरनेट बंदीच्या अफवांनी अधिक जोर धरला होता. पण सध्या तालिबान सरकारने एक अधिकृत निवदेन जारी करत या सर्व अफवांना फेटाळले असून फायबर ऑप्टिक इंटरनेट बंद पडल्याने सर्व अडथळे येते असल्याचे म्हटले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. अफगाणिस्तान संदर्भात कोणती अफवा पसरली होती.
अफगाणिस्तान संदर्भात तालिबान सरकारने इंटरनेट बंदी घातली असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती.
प्रश्न २. तालिबान सरकारने अफगाणिस्तानमधील इंटरनेट बंदीवर काय प्रतिक्रिया दिली?
तालिबान सरकारने त्यांनी अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारची इंटरनेट बंदी केली नसल्याचे म्हटले आहे.
प्रश्न ३. अफगाणिस्तानमधील इंटरनेट बंदीचे कारण काय आहे?
अफगाणिस्तानमध्ये जुने फायबर-ऑप्टिक इंटरनेट बंद पडले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात इंटरनेट कनेक्टिव्हीटीत अडथळा येत होते.
प्रश्न ४. अफगाणिस्तानमधील इंटरनेट बंदीचा देशात काय परिणाम झाला?
अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट बंदीमुळे देशातील बॅंकिंग, ईृकॉमर्स, विमान वाहतूक सेवा, इंटरनेट कनेक्टिव्हीटीवर परिणाम झाला होता.