Lawrence Bishnoi: 'राम-राम, जय श्री राम',लॉरेन्स बिश्नोई टोळीची आता कॅलिफोर्नियात दहशत; स्टॉकटनमधील गोळीबाराची घेतली जबाबदारी
नवी दिल्ली: कॅनडानंतर आता अमेरिकेतही लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरार गॅंगची चर्चा सुरु झाली आहे. या गॅंगशी संबंधित रोहित गोदारा यांनी कॅलिफोर्नियामधील स्टॉकटन येथे झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियाद्वारे या बाबत रोहित गोदारा यांनी खुलासा केला आहे. या गोळीबारात सुनीव यादवची हत्या करण्यात आली होती. सुनील यादव हा पाकिस्तानहून भारतात ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा भाग होता.
रोहित गोदारा यांची सोशल मीडिया पोस्ट
लॉरेन्स बिश्नोई टिमचा रोहित गोदारा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राम-राम, जय श्री राम सर्वांना. मी रोहित गोदारा गोल्डी बरार बोलतोय. आज कॅलिफोर्नियामधील स्टॉकटोन येथे माउंट एलबर्सच्या घर क्रमांक 6706 मध्ये सुनील यादवची हत्या आम्ही केली आहे. सुनील यादवने पंजाब पोलिसांसोबत मिळून आमच्या प्रिय भाऊ अंकित भादू यांचा एन्काऊंटर करवला होता. त्या एन्काऊंटरचा बदला आम्ही घेतला आहे. आणि यामध्ये जे कोणी सहभागी होते, त्यांचीही आम्ही शिक्षा करू.”
सुनील यादववरील आरोप
तसेच सुनील यादववर गॅंगची मुखबिरी केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. गोदारा यांनी म्हटले की, “या टोळीने पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील तरुणांना ड्रग्सच्या आहारी नेले. सुनील यादव पोलिसांच्या मदतीने ड्रग्सचा व्यापार करायचा. याशिवाय त्याचा हात अंकित भादूच्या एन्काऊंटरमध्ये होता. तो अमेरिकेत मृत्यूच्या भीतीने पळून गेला. तसेच त्याने अमेरिकन पोलिसांना आमच्या गँगच्या हालचालींबद्दल माहिती दिली. तो म्हणायचा, ‘लॉरेंस ग्रुप आपले काहीही करू शकत नाही. मी स्वतः इंटेलिजन्समध्ये आहे.’ पण आम्ही त्याचा हिशोब केला, आणि आमच्या विरोधात जे कोणी आहेत, त्यांनाही आम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू.”
सुनील यादवचा इतिहास
सुनील यादव मूळचा पंजाबच्या अबोहर फाजिलका परिसरातील होता. तो पूर्वी लॉरेंस बिश्नोई गँगशी संबंधित होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्स तस्करी करत होता. राजस्थान पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती. काही वर्षांपूर्वी त्याचा 300 कोटी रुपयांचा ड्रग्सचा कन्साइनमेंट भारतात पकडला गेला होता.
दोन वर्षांपूर्वी त्याने राहुल नावाच्या बनावट पासपोर्टवरून अमेरिकेत पलायन केले. त्याचप्रमाणे, रोहित गोदारा यांनीही बनावट पासपोर्टवरून अमेरिका गाठले होते.या पोस्टमधून गोदारा यांनी इशारा दिला की, त्यांच्या विरोधात जे कोणी काम करतील, ते कोणत्याही देशात असले तरी त्यांचा बदला घेतला जाईल. अमेरिकेसारख्या देशातही या गँगच्या हालचालींमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.