Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Los Angeles Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये एक न्यूज हेलिकॉप्टर कोसळले. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर प्राथमिक अहवालात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 16, 2026 | 03:22 PM
Los Angeles Helicopter Crash NBC4 News Chopper Crash

Los Angeles Helicopter Crash NBC4 News Chopper Crash

Follow Us
Follow Us:
  • न्यूज चॅनेलच्या हेलिकॉप्टरचा अपघात
  • ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
  • एफएए (FAA) आणि एनटीएसबी (NTSB) कडून तपास सुरु

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातून एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉस एंजेलिसमधील सॅन फर्नांडो व्हॅली भागातील चॅट्सवर्थ परिसरात एका न्यूज चॅनेलचे हेलिकॉप्टर कोसळून (Helicopter Crash) मोठा अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, परिसरातील काही वाहने आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी संध्याकाळी सुमारे ७ च्या सुमारास चॅट्सवर्थ परिसरातील नार्थ मेसन ॲव्हेन्यूच्या ९१०० ब्लॉकजवळ घडला. अपघाताच्या काही वेळ आधीच याच परिसरात एका भरधाव एसयूव्ही (SUV) कारने मेट्रो बसला जोरदार धडक दिली होती. या भीषण रस्ते अपघातात २ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले होते. या रस्ते दुर्घटनेचे आकाशातून थेट वार्तांकन (Live Coverage) करण्यासाठी एनबीसी४ (NBC4 / NewsChopper 4) या स्थानिक वृत्तवाहिनीचे बातमीदार आणि कॅमेरा टीम हेलिकॉप्टरने हवेत घिरट्या घालत होती.

दोन व्यावसायिक इमारतींच्या मध्ये कोसळले हेलिकॉप्टर

वार्तांकन सुरू असतानाच अचानक हेलिकॉप्टरवरील वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर वेगाने खाली येऊन दोन व्यावसायिक इमारतींच्या मध्यभागी असलेल्या पार्किंग लॉटवर कोसळले. जमिनीवर आदळताच तेथे उभ्या असलेल्या दोन मोठ्या शिपिंग कंटेनर्स आणि अनेक गाड्यांवर हेलिकॉप्टर आदळले. जोरदार धडकेमुळे क्षणार्धात मोठा स्फोट होऊन हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे जवळ उभ्या असलेल्या कमीत कमी चार कार आणि कंटेनर्स पेटून उठले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता

घटनास्थळावरून समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाताचा संदेश मिळताच लॉस एंजेलिस अग्निशमन दलाच्या (LAFD) ५० हून अधिक जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे कॅप्टन ब्रँडन सिल्व्हरमन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरचा पार चक्काचूर झाला होता. ढिगाऱ्याखाली शोधमोहीम राबवत असताना तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

BREAKING: TV news helicopter crashes during live shot of bus crash in Los Angeles. The helicopter belongs to NBC Los Angeles (KNBC-TV). No word yet on casualties. pic.twitter.com/kXwgr5meOP — BNO News (@BNONews) September 16, 2026

credit – social media and Twitter

एनबीसी न्यूज वाहिनीवर शोककळा

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर ते ‘एनबीसी४’ (NBC4) या वाहिनीचे ‘न्यूजचॉपर ४’ असल्याचे स्पष्ट झाले. थेट प्रक्षेपणादरम्यानच बातमीदार आणि वैमानिकाशी संपर्क तुटल्यामुळे वाहिनीच्या स्टुडिओमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ अँकर कॉलीन विल्यम्स यांनी थेट प्रसारणादरम्यान अत्यंत भावूक होत या दुर्घटनेची पुष्टी केली. एनबीसी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात निष्णात हवाई बातमीदार एलियाना मोरेनो (Eliana Moreno) आणि अनुभवी पायलट जॉर्ज मार्किनिव्ह (George Marciniw) यांच्या मृत्यूची माहिती देत तीव्र शोक व्यक्त केला आहे.

या दुहेरी दुर्घटनेमुळे संपूर्ण लॉस एंजेलिस शहरावर शोकाकुल कळा पसरली आहे. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हिन न्यूजम आणि लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh ICT Verdict : बांगलादेशात राजकीय भूकंप! 500 दिवसांनंतर बदला राजकीय? अवामी लीगच्या 7 बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा

अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

हेलिकॉप्टर हवेत असताना अचानक का कोसळले आणि तांत्रिक बिघाड झाला होता की हवामानातील बदलामुळे हा अपघात घडला, याविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघाताच्या सखोल तपासासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

लॉस एंजेलिस पोलीस आणि एफएएचे अधिकारी संयुक्तपणे हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स व ढिगारा तपासून अपघाताचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच दिवशी आधी मेट्रो बसचा भीषण अपघात आणि त्यानंतर वार्तांकन करणाऱ्या हेलिकॉप्टरचा झालेला अपघात यामुळे चॅट्सवर्थ परिसरात अत्यंत भीतीचे आणि दुःखाचे वातावरण आहे.

Web Title: Los angeles nbc news helicopter crash chatsworth san fernando valley 3 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • America
  • helicopter crash
  • Los Angeles
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO
1

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान
2

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे
3

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे

US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL
4

US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.