Los Angeles Protest Trump sends 700 Marines to LA to control Protest situation
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या लॉस एंजलिसमधील स्थलांतरितांविरोधात निदर्शने सुरु आहेत. परंतु परिस्थिती अजून नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे ट्रम्प ट्रम्प यांनी सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. आर्ट्स डिस्ट्रिक्ट आणि लिटिल टोकियोच्या भागात निदर्शक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. निदर्शकांनी पोलिसांवर वस्तू खेपल्याने पोलिसांनी फ्लॅश बॅंग आणि रबर बुलेट वापर निदर्शकांना तोडण्याचा प्रयत्न केला.
ट्रम्प यांमनी सुरुवातीला २००० नॅशनल गार्ड सैनिक लॉस एंजलिसमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले होते. परंतु यानंतर आंदोलन अधिक भडकले. लोकांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी संघीय मालमत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. सध्या लॉस एंजलिसमध्ये एकूण ४१०० सैनिक तैनात करण्यात आले आहे. तसेच ७०० मरिन सैनिकांची एक तुकडी लॉस एंजेलिसमध्ये तैनात केली आहे.
दरम्यान कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर न्यूसम आणि इतर डेमोक्रॅट्स नेत्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी अमेरिकन मरीन सैनिक आणि नॅशनल गार्ड तैनात करण्याचे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच लॉस एंजेलिसमधील परिस्थिती राज्य सरकारला हाताळणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. यामध्ये संघराज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय राज्यपालांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. तसेच नॅशनल गार्जड सैनिकांना मागे घेण्यास सांगतिले आहे. ट्रम्प असे करुन राज्यातील परिस्थीत जाणूनबुजून बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्यपालांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केला आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियातील हिंसाचारावरुन राज्यपाल आणि अधिकारऱ्यांना कडक शब्दात सुनावले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहे. दुसरीकडे लॉस एंजेलिसमध्ये २००० हून अधिक नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी गरज पडल्यास सैनिकांची संख्या वाढवण्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र आंदोलने सुरु आहेत. दरम्यान लॉस एंजेलिमध्येही ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांतर्गत संघीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ४४ लोकांना अटक केली आहे. यानंतर याच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी आंदोलन सुरु केली आहे. यामुळेच ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या परिस्थीती आणखी बिकट होत चालली आहे. आंदोलनाने हिंसत रुप घेतले आहे.