ट्रम्प जाणूनबुजून निदर्शकांना भडकवत आहेत? माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या विधानाने उडाली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या ट्रम्प यांच्या बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने सुरु आहेत. दरम्यान रविवारी (८ जून) लॉस एंजलिसमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांनी अचानक हिंसक वळण घेतले. पोलिसांच्या वाहनांना जाळण्यात आले, तर तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावर अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमाला हॅरिस यांची प्रतिक्रिया समोर आहे आहे. त्यांनी ट्रम्प सरकारच्या या कृतीचे वर्णन क्रूर आणि सुनियोजित अजेड्यांचा भाग म्हणून केले आहे.
कमला हॅरिस यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, लॉस एंजलिस हे माझे घर आहे आणि लाखो अमेरिकन लोकांप्रमाणे आमच्या घराच्या परिसरात जे घडत आहे, ते पाहून मला धक्का बसाल आहे. मला दुख झाले आहे. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या निर्णयाला अशांतता पसरवण्याचा आणि आंदोलनाला भडकवण्याचा उद्देशाने खेळलेली चाल असल्याचे म्हटले आहे.
तसेच दक्षिण कॅलिफोर्निया आणि देशभरात इमिग्रेशन धोरणांतर्गत सुरु असलेल्या ICE छाप्यांसह भीती आणि फूट पाडली जात आहे. ट्रम्प यांची ही योजना क्रूर आणि नियोजित अजेंडाचा भाग आहे, असे कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाने हे पाउल राष्ट्रीय सुरक्षेसाठी नाही, तर भीती निर्माण करण्यासाठी असल्याचे कमाल हॅरिस यांचे म्हणणे आहे. सन्मान आणि योग्य प्रक्रियेची मागणी करणार्या लोकांमध्ये भीती पसरवण्याचे काम ट्रम्प सरकार करत आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाला लटस एंजलिस पोलिस विभाग, महापौर आणि राज्यपालांनी देखील विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्थलांतरित लोकांना आमचे समर्थन आहे. त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने काढली आहेत.
My statement on what’s unfolding in Los Angeles. pic.twitter.com/rujs8mrVPK
— Kamala Harris (@KamalaHarris) June 8, 2025
लॉस एंजलिसचे महापौर आणि राज्यपाल यांनी म्हटले आहे की, आपल्या मूलभूत हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करम्यासाठी उभे राहणाऱ्या अमेरिकन लोकांच्या समर्थनार्थ आम्ही आहोत. एकत्र येभन आवाज उठवण्याची सध्या गरज आहे. स्थलांतरितांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांमना आदराने वागवणे हे आपली जबाबदारी आहे.
रविवारी (८ जून) ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना निदर्शकांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, निदर्शकांनी आता वेगळा मार्ग वापरला आहे, ते पोलिसांवर थुंकत आहे. हे अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक कृत्य आहे. पोलिसांच्या तोडांवर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. सुरक्षा दलांच्या प्रतिष्ठेशी कोणीही छेडछेडा करु नये, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.