लॉस एंजलिसमध्ये तैनात नॅशनल गार्ड म्हणजे काय? कोणाला असतो सैनिकांना आदेश देण्याचा अधिकार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिससह अनेक भागांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात हिंसक निदर्शने सुरु आहेत. रविवारी लॉस एंजलिसमधील निदर्शनात पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली, तसेच ट्रम्प विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान ट्रम्प यांनी वाढता विरोध पाहता त्याच्या नियंत्रणासाठी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले. यानंतर आंदोलनाने आणखी हिंसक वळण घेतले.
ट्रम्प यांच्या या निर्णयाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी जाणूनबुजून केलेले कृत्य म्हटले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेची ही नॅशन गार्ड फोर्स नेमकी आहे तरी काय? ही फोर्स तैनात करण्याचा अधिकार कोणाला असतो?तर आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या राखीव दलाचा एक भाग म्हणजे नॅशनल गार्ड पोर्स आहे. याच नॅशनल गार्ड फोर्सच्या दोन शाक आहेत. यामध्ये आर्मी नॅशनल गार्ड आणि दुसरी एअर नॅशनल गार्ड आहे. या फोर्सची स्थापना १९०३ मध्ये मिलिशिया कायद्यांतर्गत करण्यात आली होती. सध्या यातील आर्मी नॅशनल गार्ड लॉस एंजलिसमध्ये तैनात करण्यात आली आहे.
आपत्तीजनक मदत पुरवण्यासाठी या फोर्स तैनात केल्या जातात. यामध्ये आणीबीणी, पूर, भूकंप या परिस्थितींमध्येही नॅसनल गार्ड फोर्स तैनात करण्यात येते.
लॉस एंजलिसमध्ये वाढती अशांतता पाहता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संघीय कायद्यांतर्गत नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कायद्यानुसार, राष्ट्रपती काही विशिष्ट परिस्थिती राष्ट्रीय रक्षक दल तैनात करण्यास परवानगी देऊ शकतात. नॅशनल गार्ड हे राज्य आणि संघराज्य दोन्ही हितसंबंधांसाठी एक युनिटम्हणून काम करते.
या घटनांमध्ये अमेरिकेत तैनात करण्यात आले नॅशनल गार्ड
सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात आंदोलने सुरु आहेत. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ट्रम्प कारवाई करत आहेत. त्यांच्या या धोरणाविरोधात अमेरिकेत आंदोलन सुरु आहे. याला ट्रम्प यांनी बंड म्हणून वर्णन केले आहे. यामुळे नॅशनल गार्ड तैनात केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.