PM Modi Indonesia Visit : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; संरक्षण आणि सागरी सुरक्षेवर महत्त्वपूर्ण चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाच्या बिंतांग आदिपुर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी तो १४० कोटी भारतीयांना आणि भारत-इंडोनेशिया मैत्रीला समर्पित केला.
या सन्मानानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भारत-इंडोनेशियातील द्विपक्षीय संबंधावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांचे संबंधांना नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही देशांतील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
#WATCH | Jakarta: Indonesia President Prabowo Subianto conferred the country’s highest honour ’Bintang Adipurna of the Republic of Indonesia’ medal of honour upon PM Narendra Modi The Bintang Adipurna of the Republic of Indonesia “Medal of Honour’ is the highest honour in the… pic.twitter.com/7U6ZgbGxuz — ANI (@ANI) July 7, 2026
या भेटीत दोन्ही देशांतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. तसेच सागरी सुरक्षा, महत्त्वाची खनिजे, अन्नसुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली. हिंद महासागरात क्षेत्राक सुरक्षितता वाढविण्यासाठी दोन्ही देशांचे कोस्ट गार्ड संयुक्तपणे कार्य करती अशी सहमती देण्यात आली.
हा दौरा दोन्ही देशांच्या हिंद महासागरातील महत्त्वाची भागीदारी मानली जाते. २०१८ पासूव दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यानंतर आता, संरक्षण, व्यापार, सागरी सुरक्षा, आणि आर्थिक सहकार्याला ही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भेटीत पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या प्रंबनन मंदिरालाही भेट देणार आहे. इंडोनेशियातील हे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही आहे.
Addressing the joint press meet with President Prabowo Subianto of Indonesia.@prabowo https://t.co/LrvzAuUjzi — Narendra Modi (@narendramodi) July 7, 2026






