
maldives betrayal china spy ship male port india 3000 crore aid 2026
Maldives China spy ship Shi Yan 6 : हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात सध्या युद्धाचे ढग नसले तरी, मुत्सद्देगिरी आणि हेरगिरीचा एक भयानक खेळ सुरू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू (Maldives Muizzoo) यांनी पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला डावलून चीनच्या ‘शी यान ६’ (Shi Yan 6) या तथाकथित संशोधन जहाजाला आपल्या बंदरात नांगर टाकण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा मालदीवची अर्थव्यवस्था कोसळण्यापासून वाचवण्यासाठी भारताने त्यांना ३,००० कोटी रुपयांची मोठी मदत केली आहे.
मालदीव सध्या अत्यंत भीषण आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलना साठा संपत आल्याने मालदीववर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. या संकटकाळात ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणांतर्गत भारताने एप्रिल २०२६ मध्ये ३६० दशलक्ष डॉलर्सची (सुमारे ३,००० कोटी रुपये) ‘करन्सी स्वॅप’ मदत जाहीर केली. या मदतीमुळे मालदीवला त्यांचे आंतरराष्ट्रीय कर्ज फेडणे शक्य झाले. मात्र, या मदतीचे आभार मानण्याऐवजी, मालदीवने अवघ्या काही दिवसांतच भारताने ज्या जहाजावर आक्षेप घेतला होता, त्याच चिनी हेरगिरी जहाजाला माले बंदरात जागा दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर
चीन या जहाजाला वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणारे जहाज म्हणत असला तरी, भारतीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते हे एक ‘ड्युअल युज’ (दुहेरी वापर) जहाज आहे. हे जहाज ‘सुंदा सामुद्रधुनी’मार्गे हिंद महासागरात दाखल झाले असून त्याने ‘नाईंटी ईस्ट रिज’ सारख्या संवेदनशील भागांचे सर्वेक्षण केले आहे. हे जहाज समुद्राच्या तळाची रचना, पाण्याची क्षारता आणि खोली मोजते. ही सर्व माहिती चिनी नौदलाच्या पाणबुड्यांना भारतीय सीमेजवळ गुप्तपणे हालचाली करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. भारताचा सातत्याने विरोध असतानाही मालदीवने २४ एप्रिल रोजी या जहाजाला मालेमध्ये नांगर टाकण्याची परवानगी दिली, जो थेट भारताच्या सुरक्षेवर प्रहार मानला जात आहे.
–#China’s spy ship Shi Yan 6 entered IOR via Sunda Strait
-After its activities in IOR it anchored at Male, Maldives on April 24
-Dual use PLAN ship dubbed as scientific research vessel has real purpose of collecting data on currents, seabeds & geology, that helps in submarine… pic.twitter.com/NmGkNZpdzE — Insightful Geopolitics (@InsightGL) April 25, 2026
credit – social media and Twitter
मालदीवच्या या दुटप्पी भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही आपली सामरिक चाल खेळली आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस कल्पेनी’ मालदीवच्या अड्डू बेटावर पोहोचली आहे. अधिकृतपणे ही भेट ‘मैत्रीपूर्ण संबंध’ दृढ करण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, तज्ज्ञांच्या मते चिनी जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने ही तैनात केली आहे. मुइझ्झू सरकार चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत असले तरी, चिनी हेर जहाजांचे वारंवार येणे भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
Indian Navy’s Ship INS Kalpeni reaches Gan, Addu Atoll. This visit underscores our deep-rooted friendly ties and multi-faceted defence cooperation. 🇮🇳 🤝🇲🇻@IndianNavy@IndianDiplomacy@MEAIndia@MNDF_Official pic.twitter.com/nTY7rYLucH — India in Maldives (@HCIMaldives) April 25, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील
निवडणूक प्रचारापासूनच ‘इंडिया आऊट’ची घोषणा देणारे मुइझ्झू आता उघडपणे चीनच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहेत. भारताकडून आर्थिक रसद घ्यायची आणि चीनला लष्करी सुविधा पुरवायच्या, हे धोरण दक्षिण आशियातील शांततेसाठी घातक ठरू शकते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत या ‘विश्वासघाता’ला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: भारताने एप्रिल २०२६ मध्ये मालदीवची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ३६० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३,००० कोटी रुपये) चलन विनिमय (Currency Swap) स्वरूपात मदत दिली.
Ans: हे जहाज हिंद महासागराच्या तळाचे सर्वेक्षण करते, ज्या माहितीचा वापर चीन आपल्या पाणबुड्यांना भारतीय सागरी क्षेत्रात गुप्तपणे तैनात करण्यासाठी करू शकतो.
Ans: भारताने आपली युद्धनौका 'आयएनएस कल्पेनी' मालदीवच्या अड्डू बेटावर तैनात केली असून चिनी जहाजाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे.