Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mali Attack: आफ्रिकेत भीषण नरसंहार! राजधानी बामाकोवर दहशतवाद्यांचा ताबा; विमानतळ आणि लष्करी तळावर स्फोटांची मालिका

Mali terror attack April 2026 : शनिवारी सकाळी मालीमध्ये बंदूकधाऱ्यांनी एक मोठा हल्ला केला. हा नियोजित आणि समन्वित हल्ला देशाची राजधानी आणि इतर शहरांना लक्ष्य करून करण्यात आला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2026 | 01:05 PM
mali terror attack bamako airport kati military base jnim violence updates 2026

mali terror attack bamako airport kati military base jnim violence updates 2026

Follow Us
Follow Us:
  • भीषण रक्तपात
  • विमानतळ आणि लष्करी तळ टार्गेट
  • अल-कायदाचा हात?

Mali terror attack April 2026 : आफ्रिका (Africa Continent) खंडातील माली हा देश पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हिंसाचाराच्या खाईत लोटला गेला आहे. शनिवारी सकाळी जेव्हा बामाको शहरात लोक झोपेतून जागे होत होते, तेव्हाच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटांच्या आवाजाने शहराचा परिसर हादरून गेला. हा केवळ एक हल्ला नव्हता, तर अनेक शहरांवर एकाच वेळी करण्यात आलेला हा एक अत्यंत सुनियोजित आणि तांत्रिकदृष्ट्या समन्वित दहशतवादी हल्ला आहे.

राजधानी बामाकोत मृत्यूचे तांडव

राजधानी बामाकोच्या बाहेरील भागात असलेल्या मालीचा सर्वात मोठा लष्करी तळ ‘काटी’ (Kati) येथे दोन मोठे स्फोट झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर तासाभराहून अधिक काळ सतत गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांनी केवळ लष्करी तळावरच नाही, तर बामाको आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनेही मोर्चा वळवला. हे विमानतळ मालीच्या हवाई दलाच्या मुख्य तळाला लागून असल्याने, या हल्ल्याचा उद्देश देशाची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करणे हा असल्याचे स्पष्ट होत आहे. विमानतळावर जड शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला असून संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

अमेरिकेचा हाय-अलर्ट आणि वाढती अशांतता

या हल्ल्याच्या तीव्रतेमुळे अमेरिकन दूतावासाने तात्काळ सुरक्षा सूचना जारी केली आहे. बामाकोमधील अमेरिकन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि विमानतळाकडे जाणारे सर्व प्रवास टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ राजधानीतच नव्हे, तर मध्य मालीतील ‘सेवेरे’ सारखी शहरे आणि उत्तर भागातील गाओ आणि किदाल प्रांतातही अशाच प्रकारचे हल्ले सुरू झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये दहशतवादी ट्रक आणि मोटरसायकलवरून शहरात फिरताना दिसत असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

❗️⚠️🇲🇱 – Mali Insurgents Launch Coordinated Attacks on Military Targets Insurgents carried out simultaneous complex attacks on Saturday, April 25, 2026, targeting Mali’s main military base in Kati (just outside the capital Bamako), areas near Bamako’s airport, and several… pic.twitter.com/lMrNAYf8Yb — 🔥🗞The Informant (@theinformant_x) April 25, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

अल-कायदा आणि फुटीरतावाद्यांचे सावट

माली गेल्या अनेक वर्षांपासून अल-कायदा, इस्लामिक स्टेट आणि तुआरेग बंडखोरांच्या त्रिकोणी संघर्षाचा सामना करत आहे. शनिवारच्या या हल्ल्यामागे ‘जमात नुसरत अल-इस्लाम वल-मुस्लिमीन’ (JNIM) या अल-कायदाशी संबंधित गटाचा हात असल्याचे सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, उत्तरेकडील तुआरेग फुटीरतावाद्यांनी काही महत्त्वाचे भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. रशियन भाडोत्री सैनिक आणि मालीच्या सरकारी लष्कराने याआधी बंडखोरांचा पराभव केला होता, मात्र या ताज्या हल्ल्याने माली प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड्या पडल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मालीमध्ये झालेला हा हल्ला किती मोठा आहे?

    Ans: हा गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठा आणि सुनियोजित हल्ला मानला जात आहे, ज्यात राजधानी बामाकोसह अनेक शहरांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आले आहे.

  • Que: दहशतवाद्यांनी नेमक्या कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले?

    Ans: मुख्यत्वे 'काटी' लष्करी तळ, बामाको आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई दलाच्या तळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे

  • Que: या हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे?

    Ans: प्राथमिक तपासात अल-कायदाची सहयोगी संघटना 'जमात नुसरत अल-इस्लाम वल-मुस्लिमीन' (JNIM) या हल्ल्यात सामील असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Mali terror attack bamako airport kati military base jnim violence updates 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Africa Continent
  • Terrorist Attack
  • World news

संबंधित बातम्या

Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण
1

Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
2

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
3

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
4

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.