अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय वंशाचे व्यावसायिक आणि मोटेल मालक राकेश एहागाबन (वय ५१) यांना एका गुन्हेगाराने ठार केले आहे. पिट्सबर्गच्या रॉबिन्सन टाऊनशिप भागात स्थानिक वेळेनुसार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी राकेश आपल्या मोटेलच्या बाहेर काही लोकांमध्ये भांडण सुरु असल्याचे पाहून बाहेर आलो होते. त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव स्टॅनली यूजीन वेस्ट (वय ३७) आहे. आरोपी काही दिवसांपासून एका महिलेसह आणि लहान मुलासाह मोटेलमध्ये राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याची आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेची जोरदार भांडणे झाली. यावेळी त्याने अचानक बंदूक काढून त्या महिलेवर गोळी झाडली. महिला एका कारमध्ये आपल्या मुलासोबत बसलेली होती.
महिलेला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिने कसेबसे कार चालवत जवळच्या डिक कर्निक टायर अँड ऑटो सर्विस सेंटर पर्यंत पोहचली आणि पोलिसांनी कॉल केला. पोलिसांनी तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. तिचा मुलगाही सुरक्षित आहे.
याच वेळी गोळीबाराचा आवाज ऐकून मोटेल मालक राकेश एहागाबन बाहेर आले होते. त्यांनी आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न केला. तू ठीक आहेस का, मित्रा? असे विचारले अन् तेवढ्यात आरोपीने त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली. राकेश यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मोटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
आरोपी स्टॅनलीने घटनेनंतर तिथून पळ काढला. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करत पिट्सबर्गच्या ईस्ट हिल्स भागातून त्याला ताब्यात घेतले. पण त्याने पोलिसांवर हल्ला केला. गोळीबारात एक पोलिस जखमी झाला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात स्टॅनली देखील जखमी झाला होता. त्याला अटक करुन रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आाले आहेत.
सध्या या घटनेचा तपास सुरु असून गोळीबाराचे कारण अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासात ही घटना पूर्वनियोजित आणि विनाकारण केलेला हल्ला मानली जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतीय समुदायाने राकेश एहागाबन यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे.
प्रश्न १. अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये काय घडलं?
अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये एका भारतीय मोटेल व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
प्रश्न २. अमेरिकेत भारतीय व्यावसायिकावर हल्ला कधी आणि कुठे झाला?
अमेरिकेत पिट्सबर्ग रॉबिन्सन टाऊनशिप भागात स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी (०३ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.






