अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता राव ही २७ वर्षीय तरुण अमेरिकेच्या मेरीलँड येथे राहत होती. निकिता वेडा हेल्थ कंपनीत डेटा ॲनालिटिक्स म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी २ जानेवारी रोजी निकिता अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे, स्वत: आरोपी अर्जुनने याबाबत तक्रार नोंदवली होती. त्याने पोलिसांना तो निकिताला ३१ डिसेंरच्या संध्याकाळी भेटला असल्याचे सांगितले. परंतु यामुळेच त्याच्यावर संशय निर्माण झाला. कारण अर्जुन त्याच दिवशी भारतात पळून आला होता.
तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच भारतात पळाल्याने त्याचा निकिताच्या हत्येत सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी निकिताचा शोध सुरु केला तेव्हा आरोपी अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटची संशयावरुन झडती घेतली. यावेळी ३ जानेवारी रोजी अर्जुनच्या अपार्टमेंटमध्ये निकीताचा मृतहेद सापडला. निकीताच्या शरीरावर आरोपीने चाकूने अनेक वार केले होते.
आरोपीला भारताच्या तामिळनाडू येथे इंटरपोलकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण सुरु आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्जुनच्या अटकेसाठी अमेरिकेच्या संघीय एजन्सींनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यांना या निकिताच्या हत्याकांडाची सर्व माहिती देण्यात आली.
यानंतर इंटपोल पोलिसांनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधत, सतत देखरेख ठेवत अखेर तामिळनाडू येथे आरोपी अर्जुनला अटक केली. अर्जुनचे लवकरच प्रत्यार्पण केले जाणार आहे. सध्या अमेरिकेतील भारतीय दूतावास पीडीताच्या कुटुंबीयांसाोबत आहे. त्यांच्या काउन्सलिंगसाठी सर्व ती मदत केली जात आहे. तसेच आरोपीला देखील शिक्षा देण्यात येईल असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू






