Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mayon Volcano: फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जागृत; आकाशात राखेचे साम्राज्य अन् हजारो लोकांचे स्थलांतर, VIDEO VIRAL

Volcano Erupt: मनिलाच्या आग्नेयेला असलेल्या अल्बे प्रांतातील मायन ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर, आकाशात राखेचे लोट पसरले आणि आजूबाजूच्या परिसराला राखेने वेढले. त्यानंतर हजारो लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2026 | 09:09 AM
mayon volcano eruption philippines may 2026

mayon volcano eruption philippines may 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मायन ज्वालामुखीचा उद्रेक
  • सुरक्षितता आणि स्थलांतर
  • सतर्कतेचा इशारा (Alert Level 3)

Mayon Volcano eruption 2026 : फिलीपिन्सच्या (Philippines) अल्बे प्रांतात एका मोठ्या नैसर्गिक घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय आणि प्रसिद्ध असा ‘मायन ज्वालामुखी’ (Mayon Volcano) पुन्हा एकदा जागृत झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे प्रचंड लोट पसरले असून, आजूबाजूचा परिसर धुरकट झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मायन ज्वालामुखीचा रौद्र अवतार

मायन ज्वालामुखी आपल्या निमुळत्या आणि त्रिकोणी आकारासाठी जगभर प्रसिद्ध आहे. अल्बे प्रांतात, मनिलाच्या आग्नेयेला सुमारे ३३० किलोमीटर अंतरावर हा ज्वालामुखी स्थित आहे. रविवारच्या उद्रेकादरम्यान या ज्वालामुखीमध्ये ‘स्ट्रोम्बोलीयन’ (Strombolian activity) क्रिया सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रक्रियेमुळे ज्वालामुखीच्या मुखातून सतत लाव्हा, विषारी वायू आणि ज्वालामुखीजन्य मलबा बाहेर पडत आहे.

🌋 More than 10,000 individuals have been affected by the ongoing unrest of #MayonVolcano, and more than 5,000 persons are currently staying in evacuation centers, the National Disaster Risk Reduction and Management Council of the #Philippines said in its latest report on Monday.… pic.twitter.com/C6QWIARdYs — CCTV Asia Pacific (@CCTVAsiaPacific) May 4, 2026

credit – social media and Twitter

तज्ज्ञांच्या मते, सध्या जरी उद्रेक मध्यम स्वरूपाचा असला, तरी कोणत्याही क्षणी परिस्थिती गंभीर होऊ शकते. या उद्रेकामुळे हवेत पसरलेल्या राखेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाल्याने अनेक रस्ते आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus outbreak 2026 : समुद्राच्या मध्यभागी भयानक विषाणूचा हल्ला; आलिशान क्रूझवर 3 प्रवाशांचा मृत्यू, WHOचा सतर्कतेचा इशारा

सहा किलोमीटरचा परिसर सील आणि लेव्हल ३ चा इशारा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजी (PHIVOLCS) ने सावधगिरीचा उपाय म्हणून ‘लेव्हल ३’ चा सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आधीच्या स्तरावरून वाढवून हा इशारा लागू करण्यात आला आहे.

#NEWS | 🇵🇭 — Mayon Volcano Erupts in Albay Province, Philippines Mayon Volcano in Albay province, Philippines, experienced heightened activity on May 2, 2026, with a pyroclastic density current (PDC) triggered by lava flow collapse along the Mi-isi Gully on its… pic.twitter.com/vFTJWJVZ6e — The Global Eye (@TGEThGlobalEye) May 3, 2026

credit – social media and Twitter

प्रशासनाने ज्वालामुखीच्या ६ किलोमीटरच्या परिघात (Permanent Danger Zone) कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी दिलेली नाही. रहिवाशांना लाव्हा प्रवाह आणि भूस्खलनाचा धोका असल्यामुळे सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जवळपास ५,००० हून अधिक लोकांना तात्पुरत्या मदत केंद्रांमध्ये (Evacuation Centers) स्थलांतरित करण्यात आले आहे.

🚨Mayon stratovolcano erupts in the Philippines. The ‘Ring of Fire’ is definitely up and on…
🔥🌋🔥 https://t.co/T5Sz9dj7nN
— Nuclear Miss Information👩‍💻⚡️ (@TreeOfLifeSword) May 3, 2026

redit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kailash Mansarovar: लिपुलेख वाद पेटला! नेपाळने कैलास मानसरोवर यात्रा रोखली; बालेन सरकारने भारत आणि चीनला पाठवले ‘असे’ पत्र

जागतिक परिणाम आणि पर्यटन स्थळ

मायन ज्वालामुखी हा केवळ एक नैसर्गिक धोका नाही, तर तो फिलीपिन्सचा एक प्रमुख पर्यटन केंद्र देखील आहे. परंतु, सध्याच्या ज्वालामुखीच्या हालचालींमुळे पर्यटनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’ (Ring of Fire) चा भाग असल्यामुळे या परिसरात भूकंपाचे धक्के आणि ज्वालामुखीचे उद्रेक सामान्य मानले जातात. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर लाव्हा बाहेर पडणे आणि राख हवेत पसरणे जागतिक अर्थकारणावर आणि वातावरणावर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकते.

अल्बे प्रांताचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक (APSEMO) परिस्थितीवर अहोरात्र लक्ष ठेवून आहे. स्थानिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे. जोपर्यंत ज्वालामुखीची हालचाल पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत हा कडक इशारा कायम राहणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मायन ज्वालामुखी कुठे आहे?

    Ans: मायन ज्वालामुखी फिलीपिन्सच्या अल्बे प्रांतात (मनिलापासून आग्नेयेला) स्थित आहे.

  • Que: सध्या कोणती अलर्ट लेव्हल जारी करण्यात आली आहे?

    Ans: फिलीपिन्सच्या संस्थेने लेव्हल ३ (Intensified Unrest/Magmatic Unrest) चा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

  • Que: या उद्रेकामुळे किती लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे?

    Ans: जवळपास ५,००० लोकांना सुरक्षित मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे.

Web Title: Mayon volcano eruption philippines may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Natural calamities
  • weather news
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
4

Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.