Mexican President reacts to Trump's tariffs, says Mexico did not want conflict
मेक्सिको: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लदाण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून तीन्ही देश संतप्त झाले आहेत. तीन देशांमध्ये आणि अमेरिकेत व्यापार युद्ध सुरु झाले असून व्यापार क्षेत्रात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी देखील अमेरिकेला धमकी दिली असून ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रत्युत्तरात्मक कर लादण्याची धमकी दिली आहे.
क्लॉडिया शिनबाम यांनी शनिवारी जाहीर केले की, त्यांच्या सरकारला संघर्ष टाळायचा होता, परंतु आता त्यांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले जात आहे.यासंबंधी क्लॉडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
Rechazamos categóricamente la calumnia que hace la Casa Blanca al Gobierno de México de tener alianzas con organizaciones criminales, así como cualquier intención injerencista en nuestro territorio.
Si en algún lugar existe tal alianza es en las armerías de los Estados Unidos…
— Claudia Sheinbaum Pardo (@Claudiashein) February 2, 2025
ट्रम्प यांचा नवा टॅरिफ आदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारी रोजी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केलीआणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर 25% कर लागू करण्यात आला. तसेच, कॅनडामधून येणाऱ्या वस्तूंवरही 25% कर, तर कॅनडाच्या ऊर्जा संसाधनांवर 10% कर आकारण्यात आले आहे. याशिवाय, चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरही 10% कर लागू करण्यात आले आहे.
काय म्हणाला मेक्सिको?
राष्ट्रपती क्लॉडिया शिनबाम यांनी एक्सवर एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी आपल्या अर्थव्यवस्था मंत्र्यांना ‘प्लॅन बी’ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत मेक्सिको आपल्या व्यापारिक हितांचे रक्षण करण्यासाठी टॅरिफ आणि गैर-टॅरिफ उपाययोजना करणार आहे. मात्र, त्यांनी कोणत्या अमेरिकन वस्तूंवर टार्गेट केला जाणार आहे, हे स्पष्ट केले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, मेक्सिको आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लावण्याची तयारी करत आहे. हे टरिफ 5% ते 20% पर्यंत असण्याची शक्यता आहे.
‘अमेरिकेचे आरोप अपमानजनक’
मेक्सिकोचे अर्थव्यवस्था मंत्री मार्सेलो एबरार्ड यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला यूएस-मेक्सिको-कॅनडा व्यापार कराराचे ‘घोर उल्लंघन’ म्हणून संबोधले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “प्लॅन बी वर काम सुरू आहे आणि आम्ही जिंकू!” क्लॉडिया यांनी देखील देखील व्हाइट हाउसच्या आरोपांचे खंडन केले आहे की, ट्रम्प यांचे ड्रग्जचे आरोप अपमानजनक आहेत. तथापि, या व्यापार युद्धाने दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.