सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांचा इराणला कडक इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणने केलेल्या हल्ल्यानंतर सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी कडक शब्दात इशारा दिला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेजारी देशांवरील हल्ल्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. त्यांचे हे विधान इराणच्या हल्ल्यानंतर
सौदीच्या रियाध येथे झालेल्या अरब आणि इस्लामिक देशांच्या बैठकीनंतर आले आहे.
फैसल बिन फरहान यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने खाडी देश प्रत्युत्तर देणार नाहीत या संमभ्रमात राहू नये. तसेच इराणने आपली धोरणे आणि वर्तन पुन्हा विचारात घेण्याचा सल्ला फरहान यांनी दिला आहे. त्यांच्या मते, इराणच्या
आक्रमक राजकीय, आर्थिक, आणि नैतिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे.
इराणच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदीची राजधानी रियाध येथे अरब आणि मुस्लिम देशांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कतारच्या Ras Laffan Industrial शहरावरही हल्ला झाल्याचे समोर आले आहे. ही जगातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू केंद्रापैकी एक मानली जाते. तसेच युएई(UAE) च्या हबशान या गॅस प्रकल्पावरही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे अरब-मुस्लिम देशांच्या उर्जा क्षेत्रालाचा नव्हे, तर संपूर्ण जागाच्या उर्जा क्षेत्राला
मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणवर गंभीर आरोपही केले आहे. इराण गेल्या अनेक दशकांपासून मिलिशाया, हिजबुल्लाह, हमास या कट्टरपंथी गटांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेच अरब देशांचा
त्यांच्यावरील विश्वास ढासळला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणच्या या कारवायांना आता सहन केले जाणार नाही, इराणने सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक उर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेड क्रूड १०८ अब्ज डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. यामुळे भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.
Ans: इराणच्या अरब देशांमध्ये उर्जा साठ्यांवरली हल्ल्यानंतर सौदी संतप्त झाला असून इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.
Ans: इराणने कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल सिटी या जगातील सर्वात मोठ्या LNG (लिक्विफाइड नॅचरल गॅस) उत्पादन केंद्रावर हल्ला केला आहे.
Ans: इराणने युएईच्या हबशान या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू केंद्रावर हल्ला केला आहे.
Ans: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अरब देश इराणविरोधात लष्करी किंवा राजकीय कारवाई करु शकता. यामुळे मध्यपूर्वेत युद्ध अधिक भडकण्याची शक्यता आहे.






