फोटो सौजन्य सोशल मीडिया
कारण आता हुथींकडे सुद्धा आधुनिक हत्यारे , बॅलेस्टिक मिसाईल्स आले असून त्यांचे लढाई करणारे लोक हे पूर्णपणे प्रशिक्षित झाले असून त्यांचा धोका अधिक प्रमाणात वाढला आहे . हुथींच्या मागे इराणची ताकद लागली असल्याचे बोलले जात असते . इराणकडून हुथींना वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत मिळत असल्यामुळेच सौदीवर जोरदार हल्ले करण्यात त्यांना यश येत आहे . असे सौदी आणि अमेरिकेचे म्हणणे आहे . मुळात ही लढाई सौदीने स्वतः ओढवून घेतली आहे . असे राजकीय विश्लेषक सांगतात .
रियाधमध्ये रविवारी सकाळी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले . त्यानंतर किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्टमधील अरामकोच्या उंच इमारतीचे नुकसान झाल्याचे समोर आले . प्रत्यक्षदर्शी यांनी इमारतीच्या अनेक मजल्यांवरील खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती दिली .
काही भागांच्या बाह्य संरचनेलाही नुकसान झाल्याचे वृत्त आहे . सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाचे दिलेल्या माहितीनुसार , हल्ल्याच्या प्रयत्नदरम्यान पडलेल्या क्षेपणास्त्राच्या तुकड्यामुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे . या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही .
Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर
सौदीच्या नेतृत्वाखाली लष्करी आघाडीने दिलेल्या माहितीनुसार , रियाधच्या दिशेने डागलेली दोन बॅलेस्टिक मिसाईल्स हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केली . याशिवाय रियाध आणि दक्षिणेकडील भागांकडे येणारी क्रूझ मिसाईल्स सुद्धा रोखण्यात आल्याचे वृत्त आहे . या हल्ल्यामागे येमेनमधील इराणमधील हुथी बंडखोर असल्याचा आरोप सौदी आघाडीने केला आहे . मात्र , या विशिष्ठ घटनेबाबत हुथींकडून सुरवातीला अधिकृत प्रतिक्रिया आलेली न्हवती . त्यामुळे हल्ल्याची जबाबदारी आणि इमारतीच्या नुकसानीच्या नेमके कारण याबाबत अधिकृतपणे समोर आलेली नाही .
किंग अब्दुल्ला फायनान्शियल टॉवर हा सौदी अरेबियातील महत्वाचा आर्थिक आणि व्यावसायिक परिसर आहे . येथे अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये सौदीच्या सार्वभौम संपत्ती निधी ( PIF ) आणि शेअर बाजाराशी संबंधित महत्वाच्या संस्था आहेत .
त्यामुळे या परिसरातील अरामकोच्या इमारतीचे नुकसान होणे ही सौदीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.दरम्यान येमेनमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने सौदीची ऊर्जा केंद्रे , विमानतळ आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा धोका वाढला आहे . या घटनेमुळे आखाती देशांमधील सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक तेल पुरवठयाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे .






