Middle East War : इराणचा भयानक सूड! लारीजानींच्या हत्येनंतर जगातील सर्वात मोठा गॅस प्लंट पेटवला, UAE संतप्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी (१९ मार्च २०२६) च्या पहाटे इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE)च्या अबू धाबी येथील हबशान या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू केंद्रावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे युएई संतप्त झाला असून परिस्थिती धोकादायक झाली आहे. याशिवाय इराणने कतारमधील गॅस केंद्र, सौदी अरेबिया(Saudi Arabia), कुवेत, बहरीन या देशांच्या उर्जा केंद्रांवरही निशाणा साधला आहे.
हबशानवरील हल्ल्याने जगभरात खळबळ माजली असून पुन्हा जागतिक वायू पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. याचा केवळ युएईच्या अर्थव्यवस्थेलाच नाही, तर जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
इस्रायसल(Israel) ने १७ मार्च २०२६ रोजी इराणच्या सर्वात महत्त्वाच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा खात्मा केला होता. याशिवाय गुप्तचर मंत्री इस्लामईल खतीब, बासिच फोर्सचे प्रमुख जनरल गुलाम रेजा सुलेमानी यांचीही हत्या केली होती. तसेच इस्रायलने इराणच्या साउथ पारस ऑफशोर नैसर्गिक वायू केंद्रावरही हल्ला केला होता. याच कारवाईचा बदल घेण्यास इराणने सुरुवात केली आहे.
याच वेळी इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अमेरिका-इस्रायलला गंभीर इशारा दिला की, लारीजानी यांच्या रक्त्याच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, त्यांची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल असे त्यांनी म्हटले. याशिवाय इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील या हल्ल्यांचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लातील असे म्हटले आहे.
सध्या या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेड क्रूड १०८ अब्ज डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. यामुळे भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.
Ans: इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी, गुप्तचर मंत्री इस्माइल खतीब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने हबशान गॅस प्रकल्पावर हल्ला केला. तसेच इस्रायलने इराणच्या तेल आणि गॅस क्षेत्रावरही हल्ले केले होते. यामुळे इराणने संतप्त होत ही कारवाई केली.
Ans: हबशान नैसर्गिक गॅस प्रकल्पावर हल्ल्यामुळे जागतिक बाजारात गॅसचा तुटवडा निर्माण होऊन सिलेंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच तेल साठ्यांवरील हल्ल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.






