
US Soldiers Reveal Shocking Claims on Kuwait Attack
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर लष्करी कारवाई सुरु केली होती. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यामुळे इराणने आक्रमक होत ०१ मार्च २०२६ रोजी मध्यपूर्वेतील आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होता. यामध्ये इराणने कुवैतच्या शुएबा बंदरावर ड्रोन हल्ले केले होते. या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला होता.
संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी, ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ऑपरेशन सेंटर पूर्णपणे फोर्टिफाइड होते आणि इराणच्या ड्रोनन त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देत आत प्रवेश केला असे म्हटले होते. यामध्ये ६ अमेरिकन सैन्य ठार झाले असल्याचाही दावा त्यांनी केला होता.
दरम्यान कुवैत हल्ल्यातून बचावलेल्या एका सैनिकांनी सांगितले की, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सुरक्षित तळ नव्हता. केवळ लाकूड आणि टीनच्या पत्र्यांनी बनवलेल्या एक तात्पुरत्या स्वरुपाचा टेन्ट तयार करण्यात आला होता. अहवालानुसार हल्ल्यापूर्वी इराणकडून इशारा मिळाला होता. परंतु काही वेळातच त्यांना धोका टळल्याचा सिग्नल मिळाला. मात्र या सिग्नलच्या ३० मिनिटांनंतर ड्रोनने हल्ले केला. यामुळे मोठी जीवितहानी झाली.
जखमी सैनिकाने स्वत:वर उपचार केल्याचे सांगितले. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हीत. तेथील नागरी लोकांच्या गाडीचा वापर करण्यात आला होता. सैनिकाने म्हटले की, त्यांचे युनिट पूर्णपणे सुरक्षित नव्हते, तो एक मृत्यूचा सापळा होता. सध्या या खुलाशामुळे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु या दाव्यांवर मंत्रालयाने कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.