US Iran War : अमेरिकेचा इराणच्या छाताडावर वार! एका रात्रीत मुख्य लष्करी तळ उडवल्याचा ट्रम्प यांचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी या मोहिमेचे वर्णन मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली आणि विनाशकारी लष्कर मोहिम असे केले आहे. त्यांच्या मते, इराणची लष्करी ताकद अमेरिकेने मोडित काढली आहे. इराणच्या नौदल शक्तीला सुरुंग लावण्याचा त्यांचा हेतू होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
खर्ग बेट पर्शियन गल्फमध्ये इराणच्या किनाऱ्यापासून ३३ किमी अंतरावर स्थित आहे. हे बेट इराण (Iran) च्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. कारण या बेटावरुनच इराणच्या ९०% कच्चा तेलाचा उत्पादन जागतिक बाजारपेठेत निर्यात केले जाते. दररोज सुमारे ७० लाख बॅरल तेल येथून जहाजांमध्ये भरले जाते. तज्ज्ञांच्या मते, या केंद्रावर हल्ला इराणची आर्थिक कणा मोडण्यासाठी पुरेशी आहे.
सध्या अमेरिकेने या बेटावरील केवळ लष्करी तळांना उद्ध्वस्त केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेचा हेतू तेल टर्मिनल आणि पाइपलाइन ताब्यात घेण्याचा असून सध्या त्यांनी संयम बाळगला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी इराणने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे तेल साठेही सुरक्षित राहणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणने आक्रमक होऊन होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे अनेक तेलाचे जहाज समुद्रात अडकून पडले आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने इराणच्या अर्थव्यवस्थेवर वार केला आहे. ज्यामुळे इराण होर्मुझची पकड अधिक मजबूत करण्याची शक्यता आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल बाजारात मोठा उर्जा संकट उभे राहून इंधनाचे दर गगनाला भिडतील.
Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेने खर्ग बेटावर असलेल्या इराणच्या मुख्य लष्करी तळांवर हल्ला केला आहे.
Ans: खर्ग बेट हे इराणसाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे मानले जाते. या बेटावरुन इराणच्या एकूण कच्चे तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात या बेटावरुन होते. दररोज लाखो बॅरल्स तेल जागतिक बाजारात पाठवले जातात.
Ans: सध्या अमेरिकेने खर्ग बेटावरील इराणच्या तेल साठ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवलेले नाही, परंतु इराणने पलटवार केल्यास तेलसाठेही नष्ट होण्याची शक्यता आहे.
Ans: ट्रम्प यांनी खर्गवरील हल्ल्याची माहिती ट्रुथवरुन दिली. त्यांनी सांगितले की, इराणची कुमकुवत नस आम्ही दाबली आहे. इराणने याला प्रत्युत्तर दिले तर त्यांचे तेल साठेही सुरक्षित राहणार नाहीत असा इशारा दिला आहे.






