Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणचा भयानक सूड! लारीजानींच्या हत्येनंतर जगातील सर्वात मोठा गॅस प्लंट पेटवला, UAE संतप्त

Middle East War : मध्यपूर्वेतील संघर्ष आता पेटून उठला आहे. सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर इराण चवताळला असून इस्रायल अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा दिला आहे. जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यावरही हल्ला केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 12:13 PM
सततच्या हल्ल्यांमुळे इराणही आक्रमक; एक-दोन नाहीतर 7 देशांवर एकाचवेळी जोरदार हल्ले

सततच्या हल्ल्यांमुळे इराणही आक्रमक; एक-दोन नाहीतर 7 देशांवर एकाचवेळी जोरदार हल्ले

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचा भयानक अवतार
  • लारीजानींच्या हत्येनंतर यूएवर भीषण हल्ला
  • जागतील सर्वात मोठी गॅस फॅसिलीटी धोक्यात
Iran Attack UAE Habshan Gas Facility : अबू धाबी/तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाने (US-Israel vs Iran War) आता भयानक रुप धारण केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे इराण अमेरिका-इस्रायलविरोधात संतापला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेजारी देशांमध्ये हल्ले केले आहे. या हल्ल्यांमध्ये उर्जा केंद्रांना टार्गेट करण्याता आले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

Israel Iran War : कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचं लष्कर झालं पोरकं; इस्रायलने ‘असा’ रचला होता हत्येचा कट

मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी (१९ मार्च २०२६) च्या पहाटे इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE)च्या अबू धाबी येथील हबशान या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू केंद्रावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे युएई संतप्त झाला असून परिस्थिती धोकादायक झाली आहे. याशिवाय इराणने कतारमधील गॅस केंद्र, सौदी अरेबिया(Saudi Arabia), कुवेत, बहरीन या देशांच्या उर्जा केंद्रांवरही निशाणा साधला आहे.

जगभरात खळबळ

हबशानवरील हल्ल्याने जगभरात खळबळ माजली असून पुन्हा जागतिक वायू पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. याचा केवळ युएईच्या अर्थव्यवस्थेलाच नाही, तर  जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

इस्रायलची कारवाई

इस्रायसल(Israel) ने १७ मार्च २०२६ रोजी इराणच्या सर्वात महत्त्वाच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा खात्मा केला होता. याशिवाय गुप्तचर मंत्री इस्लामईल खतीब, बासिच फोर्सचे प्रमुख जनरल गुलाम रेजा सुलेमानी यांचीही हत्या केली होती. तसेच इस्रायलने इराणच्या साउथ पारस ऑफशोर नैसर्गिक वायू केंद्रावरही हल्ला केला होता. याच कारवाईचा बदल घेण्यास इराणने सुरुवात केली आहे.

खामेनेईंचा गंभीर इशारा 

याच वेळी इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अमेरिका-इस्रायलला गंभीर इशारा दिला की, लारीजानी यांच्या रक्त्याच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, त्यांची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल असे त्यांनी म्हटले. याशिवाय इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील या हल्ल्यांचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लातील असे म्हटले आहे.

जागतिक परिणाम

सध्या या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेड क्रूड १०८ अब्ज डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. यामुळे भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.

Middle East War : ‘रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार’ ; मोजतबा खामेनेईंचा इस्रायल-अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने युएईमधील हबशान गॅस प्रकल्पावर हल्ला का केला?

    Ans: इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी, गुप्तचर मंत्री इस्माइल खतीब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने हबशान गॅस प्रकल्पावर हल्ला केला. तसेच इस्रायलने इराणच्या तेल आणि गॅस क्षेत्रावरही हल्ले केले होते. यामुळे इराणने संतप्त होत ही कारवाई केली.

  • Que: हबशानवरील हल्ल्याचा जागतिक परिणाम काय होईल?

    Ans: हबशान नैसर्गिक गॅस प्रकल्पावर हल्ल्यामुळे जागतिक बाजारात गॅसचा तुटवडा निर्माण होऊन सिलेंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच तेल साठ्यांवरील हल्ल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

Web Title: Middle east war iran attack uae habshan gas facility ali larijani assisiation us israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन
1

Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन

Peace Deal: जागतिक शांततेसाठी अमेरिकेची मोठी खेळी; JD Vance यांची कतारच्या पंतप्रधानांशी गुप्त भेट; ‘एक पानी’ करारावर जगाचे लक्ष
2

Peace Deal: जागतिक शांततेसाठी अमेरिकेची मोठी खेळी; JD Vance यांची कतारच्या पंतप्रधानांशी गुप्त भेट; ‘एक पानी’ करारावर जगाचे लक्ष

Women Rights: ‘नोकरी द्या, अन्यथा शरीरसंबंध ठेवा!’ घानामधील लज्जास्पद प्रथेवर राष्ट्राध्यक्ष करणार कायद्याचा ‘असा’ कठोर वार
3

Women Rights: ‘नोकरी द्या, अन्यथा शरीरसंबंध ठेवा!’ घानामधील लज्जास्पद प्रथेवर राष्ट्राध्यक्ष करणार कायद्याचा ‘असा’ कठोर वार

Iran US war: ‘शांततेची चर्चा केवळ षडयंत्र!’ इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रम्पवर सडकून वार; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका
4

Iran US war: ‘शांततेची चर्चा केवळ षडयंत्र!’ इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रम्पवर सडकून वार; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.