
मिळालेल्या माहितीनुसार, इराण(Iran) च्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) अमेरिका-इस्रायल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना तात्काळ बाहेर पडण्यास सांगितले आहे. इराणवरील हल्ल्यांचा बदला घेतला जाणार असून कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये असे म्हटले आहे.
याच वेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायवर गंभीर आरोप केले आहेत. इराणने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने त्यांच्या दोन मोठ्या स्टील कारखान्यावर, नागरी दोन मोठ्या स्टील फॅक्टरी नागरी अणू प्रकल्प आणि एका पॉवर प्लांटला लक्ष्य केले आहे. यावर अराघची यांनी संताप व्यक्त केला आहे. इस्रायलला या हल्ल्यांची मोठी किंमक मोजावी लागेल असे म्हटले आहे.
Israel has hit 2 of Iran’s largest steel factories, a power plant and civilian nuclear sites among other infrastructure. Israel claims it acted in coordination with the U.S. Attack contradicts POTUS extended deadline for diplomacy. Iran will exact HEAVY price for Israeli crimes — Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 27, 2026
याच वेळी इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेसवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात १२ अमेरिकन सैनिक जखमी झाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, या हल्ल्यात हवेत इंधन भरणारी अमेरिकेची अनेक विमाने नष्ट झाली आहे. परंतु अमेरिकेने केवळ एका टॅंकरचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी अमेरिकेने जपानमधील तैनात सैनिक आखाती देशांमध्ये रवाना केले आहे. तब्बल ३,५०० सैनिक युद्धनौकेसह खाडी देशात पोहोचले आहेत. याशिवाय USS Tripoli (LHA-7) हे महाकाय असॉल्ट शिप देखील २७ मार्च रोजी मध्यपूर्वेत दाखल झाले आहे. इराणकडून सातत्याने होणारे ड्रोन आणि मिसाइल हल्ले पाहात अमेरिका इराणमध्ये जमिनीमार्गे कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
Ans: इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिका-इस्रायल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या इराणीन नागरिकांना कामाची ठिकाणे सोडण्याचा आदेश दिला आहे.
Ans: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलने नागरी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हटले आहे.
Ans: इस्रायलने इराणच्या स्टील कारखाने आणि बुशहर न्यूक्लियर पावर प्लांट यासारख्या नागरी व औद्योगिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.